बंगालमध्ये भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर आक्रमण

बंगालमध्ये निवडणूक चालू असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर निवडणूक शांततेच होईल का ? निवडणूक आयोगाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना आदेश दिला पाहिजे !

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील भाजपचे नेते आणि निवडणुकीतील उमेदवार शुभेंदू अधिकारी यांचे भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीवर कांठी येथे अज्ञातांकडून आक्रमण करण्यात आले. या वेळी सौमेंदू गाडीमध्ये नव्हते; मात्र या आक्रमणात वाहनचालक घायाळ झाला. या आक्रमणामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

तत्पूर्वी पश्‍चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील गारघेटा विधानसभा मतदारसंघात माकपचे  उमेदवार सुशांत घोष यांच्यावरही आक्रमण झाले. मेदिनीपूर जिल्ह्यातील भगवानपूर विधानसभा मतदारसंघातील सतसतमल येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत २ सुरक्षा कर्मचारी घायाळ झाले होते.