आसाममध्ये पुन्हा सत्तेत आल्यास ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदे करू ! – अमित शहा यांचे आश्‍वासन

आसाममध्ये ३४ पैकी ११ जिल्हे मुसलमानबहुल !

केवळ आसामसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी असे कायदे केंद्र सरकारने केले पाहिजेत ! इतकेच नव्हे, तर समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतर बंदी कायदा आदी कायदेही करणे आवश्यक आहेत !

गौहत्ती (आसाम) – जर आसाममध्ये पुन्हा भाजपचे सरकार आले, तर ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदा केला जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी एका सभेमध्ये दिले.

आसाममध्ये ३४ पैकी ११ जिल्हे मुसलमानबहुल आहेत. एकूण राज्यात २५ टक्के मुसलमान आहेत, असे सांगण्यात येत आहे. राज्यात हिंदूंच्या लोकसंख्येचा दर २-३ टक्क्यांनी वाढत आहे, तर मुसलमानांचा २० ते ३० टक्क्यांनी वाढत आहे, असेही म्हटले जात आहे. विशेषतः बांगलादेशच्या सीमेला लागून असणार्‍या जिल्ह्यामंध्ये मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. यामागे घुसखोरी हे सर्वांत मोठे कारण मानले जात आहे.