केरळमध्ये मागील ५ वर्षांत ६५ सहस्र कोटी रुपयांची मद्यविक्री !

केरळमधील जनतेला मद्यपी बनवण्याचा घाट घालणारे जनताद्रोही साम्यवादी सरकार ! महसुलाच्या हव्यासापायी जनतेच्या आरोग्याशी खेळणारे साम्यवादी सरकार जनहित काय साधणार ?

कोची – साम्यवाद्यांची सत्ता असलेल्या केरळमध्ये मागील ५ वर्षांत झालेल्या मद्यविक्रीचे मूल्य ६५ सहस्र कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. मद्याच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकारात हे सूत्र उघडकीस आले आहे.

सत्तेत आल्यानंतर साम्यवाद्यांनी अवलंबलेल्या काही धोरणांमुळे मद्यविक्रीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यापूर्वी सत्तेत असलेल्या युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट सरकारने बंद पाडलेली सर्व मद्यालये साम्यवाद्यांनी सत्तेत येताक्षणी पुन्हा चालू केली, तसेच २०० नव्या मद्यालयांना आणि ९ क्लबनाही मद्यविक्री करण्याची अनुमती देण्यात आली आहे. वर्ष २०१८ ला केरळमध्ये झालेला जलप्रलय आणि वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे जरी केरळची अर्थव्यवस्था ढासळली असली, तरीही मद्यविक्रीचे हे आकडे विस्मयकारक असल्याचे बोलले जात आहे.