(म्हणे) ‘मोदी सरकार संपूर्ण आशिया खंडाला संघर्षाच्या खाईत ढकलू शकते !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

भारत नाही, तर पाकने गेली ३ दशके दक्षिण आशिया खंडाला हिंसाचाराच्या गर्तेत ढकलेले आहे, ही वस्तूस्थिती आहे ! पाकचा नायनाट केल्याविना हे थांबणार नाही आणि ते मोदी सरकारने करावे, असेच भारतियांना वाटते !

पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये आणखी एका मंदिरांवर आक्रमण होण्याची शक्यता ! – हिंदु नेत्याची भीती

पाकमधील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित ! हवेलियन नगर येथे असलेल्या एका प्राचीन मंदिराला धोका आहे. या मंदिराच्या परिसरात एक अन्य प्राचीन ढाचा आहे. भू माफिया हा ढाचा तोडण्याची शक्यता आहे.

‘अ‍ॅमेझॉन प्राईम’च्या प्रमुखांसह ‘तांडव’चे निर्माता-दिग्दर्शक, लेखक आदींविरुद्ध गुन्हे नोंद

केंद्र सरकारने समन्स बजावण्यात वेळ न घालवता थेट या वेब सिरीजवर बंदी घालून वेब सिरीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करावा, अशीच हिंदूंची मागणी आहे !

‘तांडव’ वेब सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांची क्षमायाचना

‘जफर यांनी क्षमा मागितली असली, तरी जोपर्यंत या वेब सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकले जात नाहीत, तोपर्यंत विरोध चालूच रहाणार’, असे हिंदू आणि त्यांच्या संघटनांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरील माहिती चोरी होण्याची भीती असेल, तर ते भ्रमणभाषमधून काढून टाका ! – देहली उच्च न्यायालय

जर तुम्हाला वाटते की, व्हॉट्सअ‍ॅप तुमची माहिती सुरक्षित ठेवू शकणार नाही, तर तुम्ही ते तुमच्या भ्रमणभाष संचामधून काढून टाका, असा सल्ला देहली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिला.

तिरुनेलवेली (तमिळनाडू) येथील मंदिराच्या भूमीवर अवैधरित्या बांधलेली ख्रिस्ती दफनभूमी हालवण्यात येणार !

हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! प्रत्येक न्यायहक्कांसाठी हिंदूंनी आवाज उठवल्यावर प्रशासन आणि राज्य सरकारे यांना जाग येते, असाच आतापर्यंतचा अनुभव आहे. हे थांबण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

केरळ राज्यातील शालेय अभ्यासक्रमात शस्त्रकर्माचे जनक म्हणून सुश्रुताचार्य ऐवजी अबू अल कासीम याचा उल्लेख

धर्मांधांचे उदात्तीकरण करण्यासाठी खोटा इतिहास प्रसारित करणारे केरळच्या साम्यवादी सरकारचे शिक्षण मंडळ ! लहानपणापासून मुलांना खोटा इतिहास शिकवून भावी पिढीची दिशाभूल करणार्‍या साम्यवाद्यांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक !

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि महाविकास आघाडी दोघांचे यशाचे दावे !

सर्वाधिक ग्रामपंचायतींत भाजपचा विजय झाल्याचा दावा भाजपने, तर ८० टक्के ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्याचा दावा त्यांनी केला आहे. १९ जानेवारी या दिवशी निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट होईल.

(म्हणे) ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये द्वेष पसरवला जातो ! – नसीरुद्दीन शाह

मशिदींमधून लव्ह जिहादचे फतवे निघतात, धर्मांध युवकांना पैसा पुरवला जातो, याची कबुली शेकडो प्रकरणांत युवकांनी पोलीस ठाण्यांत दिलेली आहे, हे शाह यांना माहीत नाही काय ?

भूमीच्या मालकीसाठी सत्तरीत एक दिवस उठाव होणार !  विश्‍वेश परब, युवा आंदोलक, मेळावली

भूमीच्या मालकीसाठी सत्तरीत एक दिवस उठाव होणार आहे, असे विधान मेळावली येथील आयआयटी विरोधातील युवा आंदोलक श्री. विश्‍वेश परब यांनी केले. ‘भारत माता की जय’ संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘मेळावली वाचवा लोकशाही वाचवा’, या विषयावर ते बोलत होते.