(म्हणे) ‘मोदी सरकार संपूर्ण आशिया खंडाला संघर्षाच्या खाईत ढकलू शकते !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

भारत नाही, तर पाकने गेली ३ दशके दक्षिण आशिया खंडाला हिंसाचाराच्या गर्तेत ढकलेले आहे, ही वस्तूस्थिती आहे ! पाकचा नायनाट केल्याविना हे थांबणार नाही आणि ते मोदी सरकारने करावे, असेच भारतियांना वाटते !

इस्लामाबाद (पाकिस्तान) –  भारतातील मोदी सरकार संपूर्ण आशिया खंडाला एका संघर्षाच्या खाईत ढकलू शकते, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद प्रसारित झाला आहे. या संवादावरून गोस्वामी यांना पुलवामा आक्रमण आणि बालाकोट एअरस्ट्राईक यांची माहिती असल्याचे समोर आले आहे. यावरून इम्रान खान यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना वरील विधान केले आहे.

इम्रान खान यांनी केलेले ट्वीट

१. पाकिस्तानातील आतंकवादामागे भारतीय प्रायोजकत्व, भारतव्याप्त जम्मू काश्मीर आणि आमच्याविषयी १५ वर्षांपासून चुकीची माहिती पसरवणारी मोहीम या चॅटमुळे उघडकीस आली आहे. आता भारतातील माध्यमांनी त्याचे संबंध उघड केले आहेत, जे आण्विक क्षेत्राला संघर्षाच्या टोकाकडे ढकलत आहेत.

२. मी पुन्हा एकदा हे सांगतो की, माझे सरकार भारत आणि मोदी सरकार यांच्या फॅसिस्टवादाविरुद्ध युद्धजन्य डाव उघडे पाडत राहिले. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला दायित्वशून्य आणि सैनिकी धोरण यांपासून थांबवायला हवे; कारण मोदी सरकार संपूर्ण आशिया खंडाला एका संघर्षामध्ये ढकलू शकते.