(म्हणे) ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये द्वेष पसरवला जातो ! – नसीरुद्दीन शाह

  • लव्ह जिहादला बळी पडलेल्या देशातील लक्षावधी युवतींच्या दुर्दैवी कहाण्या हा त्यांचा चित्रपटांप्रमाणे खोटा अभिनय नाही, हे नसिरुद्दीन शाह यांनी लक्षात घ्यावे ! ‘लव्ह जिहाद’ला नाकारणे हे शाह अभिनेता असूनही त्यांच्यात यत्किंचतही संवेदनशीलता नसून हिंदुद्वेष ठासून भरल्याचेच द्योतक आहे !
  • मशिदींमधून लव्ह जिहादचे फतवे निघतात, धर्मांध युवकांना पैसा पुरवला जातो, याची कबुली शेकडो प्रकरणांत युवकांनी पोलीस ठाण्यांत दिलेली आहे, हे शाह यांना माहीत नाही काय ?
  • भारतात नव्हे, तर जगभर लव्ह जिहादचे षड्यंत्र धर्मांधांनी निर्माण केले आहे. केरळ उच्च न्यायालयाने लव्ह जिहाद असल्याचे सांगितले आहे. लक्षावधी हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर हिंदूंनी त्याविषयी काही बोलणे म्हणजे ‘द्वेष पसरवणे’ असे म्हणणारे धूर्त आणि खोटारडे नसीरुद्दीन शाह !
अभिनेते नसीरुद्दीन शाह

मुंबई – ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये द्वेष पसरवला जात आहे, असे वक्तव्य अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीमध्ये केले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, यूपी (उत्तरप्रदेश)मध्ये लव्ह जिहादच्या तमाशात लोकांना कसे विभागले जात आहे, हे पाहून मला पुष्कळ राग येतो. (शाह यांनी लव्ह जिहादमध्ये संपूर्ण आयुष्याची फरफट झालेल्या हिंदु युवतींचे व्हिडिओ पहावेत, म्हणजे तमाशा कोण करत आहे, ते कळेल ! – संपादक) ज्यांनी हा शब्द सिद्ध केला आहे, त्यांना जिहाद शब्दाचा अर्थ माहीत नाही. (जिहाद शब्दाचा अर्थ मुसलमानांच्या दृष्टीने कितीही चांगला असला तरी हिंदूंच्या दृष्टीने तो कसा असेल ? कुराणात जिहाद म्हणजे गैरमुसलमानांना मारणे त्यांचे ‘धार्मिक कर्तव्य’ असल्याचे सांगितले आहे. जिहादची ही शिकवण चांगली आहे, असे वाटणारे त्याच प्रवृत्तीचे आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक) भारतात मुसलमानांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक होईल, असा विचार करण्याइतका कोणी मूर्ख कसा असेल ?, हे मला समजत नाही, शाह म्हणाले. (आज भारतात शेकडो ठिकाणे, तसेच प्रदेश मुसलमानबहुल झाले आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद करून ते मुसलमानबहुल करण्यात आले नाही का ? हिंदूंना मूर्ख म्हणून जनतेची दिशाभूल करणारे शाह यांनी स्वातंत्र्याच्या वेळी आणि आज असलेली मुसलमानांची टक्केवारी अभ्यासावी ! – संपादक)

शाह म्हणाले की, रत्ना पाठक यांनी लग्नानंतर त्यांचा धर्म बदलणार नाहीत हे त्यांनी आपल्या आईला स्पष्टपणे सांगितले होते. (श्रीमंत आणि वलयांकित अभिनेत्रींची समाजातील सर्वसामान्य मुलींशी तुलना करून कशी चालेल ? एवढेही शाह यांना लक्षात येत नाही का ? – संपादक)

शाह पुढे म्हणाले की, माझी आई अशिक्षित होती, रूढीवादी कुटुंबात मोठी झाली, दिवसातून पाच वेळा नमाज करायची, तिने आयुष्यभर उपवास केले, हजला गेली. ती म्हणायची लहानपणापासून आम्ही तुम्हाला जे शिकवले त्या गोष्टी कशा बदलतील ? एखाद्याचे धर्मांतर करणे पूर्णपणे चुकीचे आहे. (हे शाह यांनी स्वतःच्या बांधवांना नीट समजावून सांगावे. सर्व मुसलमान एवढे साळसूद असते, तर भारतात दंगली झाल्याच नसत्या ! सहस्रो काश्मिरी पंडितांना आज निर्वासित जीवन जगावे लागले नसते ! – संपादक)

वर्ष २०१८ मधील एका मुलाखतीचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘‘मी म्हणालो होतो की इथे माणसाला मारण्यापेक्षा गायीचा मृत्यू महत्त्वाचा आहे. नेमका याच गोष्टीचा मला राग आहे.’’ (शाह यांना प्रत्येक गोष्टीचा राग येत असेल, तर ते पाकमध्ये का निघून जात नाहीत ? धर्मांधांना तर माणसाचाही मृत्यू महत्त्वाचा वाटत नाही, तर गायीचा काय वाटणार ? – संपादक)

ते म्हणाले की, की मी रागावलो आहे; पण घाबरत नाही. मी का घाबरू? मी माझ्या स्वतःच्या देशात, माझ्या घरात आहे. माझ्या कुटुंबाच्या पाच पिढ्या या मातीत मिसळल्या आहेत. (शाह यांना घरात रहातो, असे वाटते, तर त्यांनी या हिंदूंच्या घरात घरासारखे हिदूंमध्ये मिसळून रहावे. समाजाची दिशाभूल करून त्यात द्वेषाची वाळवी पसरवू नये ! – संपादक)