|
तिरुनेलवेली (तमिळनाडू) – भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास अडचण येऊ नये; म्हणून तमिळनाडू सरकारने तिरुनेलवेलीजवळील मनिमूर्तीश्वर उच्छिष्ठ गणपति मंदिरासमोरील ख्रिस्ती दफनभूमी दुसर्या ठिकाणी हालवण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शहर पोलीस आयुक्त दीपक दामूर आणि उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) एस्. सारवाना यांना लिगल राईट्स ऑबझर्व्हेटरी (एल्.आर्.ओ.) या हिंदु संघटनेने कायदेशीर नोटीस दिल्यानंतर राज्य सरकारने एका अधिसूचनेनुसार वरील निर्णय घेतला आहे. (हिंदु संघटनेने नोटीस देईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? – संपादक)
१. मंदिराच्या मालकीच्या भूखंडावर ‘सेक्रेड हार्ट चर्च’ने अवैधरित्या त्याची मालकी सांगून नियंत्रण मिळवले होते. चर्चच्या विरोधात कारवाईची मागणी करणार्या हिंदूंना अटक करून राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एन्.एस्.ए.) अंतर्गत कारागृहात टाकण्यात आले होते. (चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याच्या वृत्तीचे तमिळनाडूतील अण्णाद्रमुक सरकार आणि प्रशासन ! न्याय्यहक्कांसाठी अशी मागणी करणार्या हिंदूंवर कारवाई करणार्यांना कारागृहात डांबा ! – संपादक)
The Tamil Nadu government has agreed to get the Christian cemetery built in front of Manimoortheeswaram Uchishta Ganapathy Temple near Tirunelveli shifted to another placehttps://t.co/yXxCQ6vHuF
— OpIndia.com (@OpIndia_com) January 13, 2021
२. यापूर्वीही एल्.आर्.ओ.ने ऑगस्ट २०१९ मध्ये उपायुक्तांकडे मंदिराच्या भूमीवरील अवैध ख्रिस्ती दफनभूमी हटवण्याची मागणी केली होती. यावर उत्तर देतांना तिरुनेलवेली जिल्हाधिकार्यांनी ही दफनभूमी खासगी जागेत असल्याचे सांगत येथे मृतदेहांचे दफन करण्यावर बंदी घातली होती. तरीही येथे मृतदेहांचे दफन करणे चालूच राहिले होते आणि तेथे थडगी बांधण्यात आली होती. (उद्दाम आणि नियमबाह्य वर्तन करणारे ख्रिस्ती ! – संपादक)
३. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इंदू मक्कल कत्छीच्या कार्यकर्त्यांनी येथील थडग्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर पाद्री आणि काही राजकीय पक्ष यांंनी तिरुनेलवेलीच्या जिल्हाधिकारी सौ. शिल्पा प्रभाकर सतीश यांची भेट घेऊन ‘थडगी पाडणार्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत खटला चालवावा’, अशी मागणी केली होती. त्यानंतर इंदू मक्कल कत्छीच्या ८ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. (धर्मांध ख्रिस्त्यांच्या ताटाखालचे मांजर बनलेले असे प्रशासकीय अधिकारी समाजहित काय साध्य करणार ? – संपादक) त्यांतील ७ जणांवर नोंदवण्यात आलेला हा कायदा हटवून जामिनावर सोडण्यात आले आहे, तर एकजण अटकेत आहे.