ओढ्यावरील रेणुकादेवीची आंबील यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रहित

ओढ्यावरील रेणुकादेवीची आंबील यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रहित करण्यात आली आहे. गेल्या १०० वर्षांत पहिल्यांदाच कोरोनामुळे यात्रा रहित करावी लागली असून भाविकांनी ३० जानेवारीपर्यंत गर्दी न करता देवीला नेवैद्य अर्पण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तगटाचे तरुण घडवणार्‍या श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा !

प्रत्येक धारकरी, शिवप्रेमी डोळ्यांत प्राण आणून धारातीर्थ यात्रेच्या दिनांकाची वाट पहात होता. अखेर २८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत धारातीर्थ यात्रा होत असल्याचे घोषित झाल्यामुळे धारकरी मोहिमेच्या पूर्वसिद्धतेला लागले आहेत.

कोटी कोटी प्रणाम !

• स्वामी श्रद्धानंद यांचा आज स्मृतीदिन (दिनांकानुसार)
• सांगली येथील सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा यांचा आज वाढदिवस
• ओशेल, शिवोली (गोवा) येथील श्री देवी महाकालिका कुंभळेश्‍वर देवतांचा जत्रोत्सव !

केरळमधील सिस्टर अभया हत्येच्या प्रकरणात २८ वर्षांनंतर पाद्री आणि नन दोषी !

चर्च आणि त्याच्याशी निगडित संस्था हे अनाचाराचे अड्डे ! या प्रकरणात गुन्हेगारी वृत्तीच्या पाद्री आणि नन यांना वाचवणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई हवी ! हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारे पुरोगामी आणि निधर्मीवादी आता गप्प का ?

पाकिस्तानी सैन्याच्या बलुची नागरिकांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठवणार्‍या करिमा बलुच यांचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

बलुचिस्तानसाठी लढणार्‍या व्यक्तीचा अशा प्रकारे संशयास्पदरित्या मृत्यू होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. पत्रकार साजिद हुसैन यांचा ही असाच मृत्यू झाला होता !

उत्तरप्रदेश सरकार राज्यात १२० नव्या गोशाळा उभारणार

सरकारने केवळ नव्या गोशाळा उभारू नयेत, तर राज्यात आतापर्यंत अस्तित्वात असणार्‍या गोशाळांची स्थिती अधिक कशी चांगली होईल आणि तेथील गायी सुरक्षित कशा रहातील, याकडेही लक्ष दिले पाहिजे !

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे एअर इंडियाकडून ओमान आणि सौदी अरेबिया येथील विमानसेवाही स्थगित

कोरोनाच्या नव्या प्रकाराचे भारतात संक्रमण होऊ नये म्हणून एअर इंडियाने ब्रिटनसह ओमान आणि सौदी अरेबिया येथे जाणारी विमानसेवा स्थगित केली आहे.

गोवा मांस प्रकल्पात हत्या करण्यासाठी शेजारच्या राज्यांतून पशू आणण्यास नोंदणीकृत दलालांना अनुमती ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

“३० टक्के लोकांसाठी आपल्याला हे करावे लागत आहे”, तर गोव्यातील ७० टक्के हिंदूंच्या भावनांचा तुम्ही कुठेच विचार करत नाही. यापुढे असे चालणार नाही.

कुलगाममध्ये २ आतंकवादी शरण

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोएबाच्या २ स्थानिक आतंकवाद्यांनी ‘त्यांच्या कुटुंबियांच्या आवाहनानंतर आत्मसमर्पण केले’, असे पोलिसांनी सांगितले.

स्वराज गोमंतक संस्थेकडून वेर्ला येथे महिलांसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर

गोवा मुक्तीदिनाचे औचित्य साधून ‘स्वराज गोमंतक’ या संघटनेकडून समाजासाठी विशेषतः महिला आणि युवती यांच्यासाठी अनिवासी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. वेर्ला-काणका येथील सातेरीनगर क्रीडा मैदानात १६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२० या कालावधीत हे शिबिर घेण्यात आले.