विरार येथे जातीय तेढ निर्माण करणार्या फलकावरील लिखाण !
विरार – येथील मनवेलपाडा चौकात नवबौद्ध संघटनांच्या वतीने १ जानेवारी हा ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी तेथे मोठ्या फलकावर कोरेगाव भीमा येथील लढाईचा संदर्भ देत ‘मर्द महाराची कहाणी, चिंधड्या उडविल्या २५,००० पेशव्यांच्या त्या ५०० महारांनी’ असे लिहिण्यात आले होते. (प्रत्येक वेळी पेशव्यांच्या संदर्भात खोटा इतिहास पसरवून जातीयद्वेष वाढवणार्या अशा कार्यक्रमांना विरोध करायला हवा, तसेच अशा कार्यक्रमांना अनुमतीच द्यायला नको ! – संपादक)