३ जानेवारीला रात्री घाटीवडे येथे बागायतीची मोठी हानी
दोडामार्ग – तालुक्यातील हेवाळे घाटीवडे येथील शेतकरी व्यंकटेश देसाई यांच्या नारळ, सुपारी, केळी यांच्या बागांची हत्तीने ३ जानेवारीला मोठी हानी केली. यामुळे संतप्त झालेले शेतकरी आणि बागायतदार यांनी ‘आता तात्पुरत्या उपाययोजना नकोत, तर हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा आणि तालुका हत्तीमुक्त करा’, अशी मागणी केली आहे.
गेल्या २४ वर्षांपासूनची हत्तींची समस्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषत: दोडामार्ग तालुक्यात या हत्तींनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात हानी केली आहे आणि आताही ते हानी करत आहेत. येथील शेतकर्यांनी पिढ्यानपिढ्या श्रम करून निर्माण केलेल्या नारळ, सुपारी, केळी यांच्या बागायती आणि शेती डोळ्यांदेखत नष्ट होत असल्याने उदरनिर्वाहाचे साधनही हिरावले जात आहे. या हत्तींनी केवळ वित्तहानी नाही, तर जीवितहानीही केली आहे. २४ वर्षांपासूनच्या या समस्येवर लोकप्रतिनिधी, सरकार आणि प्रशासन यांना ठोस उपाययोजना काढण्यात अपयश आल्याने शेतकर्यांच्या भावना तीव्र होत आहेत.
संपादकीय भूमिकाअशी मागणी आणखी किती वर्षे करावी लागणार ? |