कुलगाममध्ये २ आतंकवादी शरण

शरणागती पत्करलेले लष्कर-ए-तोयबाचे आतंकी

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकांच्या निकालांच्या वेळेत आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोएबाच्या २ स्थानिक आतंकवाद्यांनी शरणागती पत्करली. ‘त्यांच्या कुटुंबियांच्या आवाहनानंतर त्यांनी आत्मसमर्पण केले’, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून २ पिस्तुल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.