३ आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी

मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण

 

बीड – मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सोनवणे यांना अटक करून ४ जानेवारीला केज येथील न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत सरकारी अधिवक्त्यांनी ९ डिसेंबरपासून हे सर्वजण पसार होते. त्यामुळे त्यांना कुणी साहाय्य केले याची चौकशी करणे आवश्यक आहे. हे लोक टोळीने गुन्हे करतात, उद्योगधंद्यांना त्रास देतात. त्यामुळे जिल्ह्यात उद्योगधंदे येत नाहीत. हे लोक संघटित गुन्हेगार असून यांना ‘मकोका’ लावण्याची आवश्यकता आहे, असा युक्तीवाद केला.