सीबीआय न्यायालयाचा निकाल !
|
थिरुवनंतपूरम् – सीबीआय न्यायालयाने २८ वर्षांपूर्वी घडलेल्या सिस्टर अभया हत्येच्या प्रकरणात पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना दोषी ठरवले आहे. कोट्टायम येथील एका कॉन्व्हेंटमध्ये सिस्टर अभया वास्तव्य करत होत्या. २७ मार्च १९९२ ला पहाटे ४.१५ वाजता सिस्टर अभया स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेल्या असत्या त्यांनी पाद्री फूथराकयाल, पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना नकोत्या स्थितीत पाहिले होते. त्या वेळी ‘स्वतःचे कुकृत्य जगासमोर येईल’ म्हणून या तिघांनी तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. या प्रकरणातील आरोपी पाद्री फूथराकयाल यांची २ वर्षांपूर्वी पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
न्यायालयाने निकाल देतांना म्हटले की, या दोघांच्या विरोधात सापडलेल्या पुराव्यांवरून त्यांच्यावरील आरोप निश्चित झाले आहेत. सध्या हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सनल कुमार यांनी या प्रकरणात निर्णय दिला. या प्रकरणी २३ डिसेंबर या दिवशी शिक्षेची सुनावणी देण्यात येणार आहे.
अपराध लपवण्यासाठी पुरावे मिटवले !
#Kerala | “Father Thomas Kottoor, Sister Sefi convicted in 1992 #SisterAbhaya murder case”
Read more about #abhayacase herehttps://t.co/48Fg4eLPBv
— Outlook Magazine (@Outlookindia) December 22, 2020
पाद्री थॉमस कोट्टूर हा कोट्टायम येथील बी.सी.एम्. विद्यालयात मानशास्त्र शिकवत होता. तो तत्कालीन बिशप यांचा सचिवही होता. त्यानंतर तो कॅथॉलिक डायोसेसनचा चांन्सलरही होता, तर सिस्टर सेफी हिचे अभया ज्या हॉस्टेलमध्ये वास्तव्य होते, तेथे वास्यतव्य होते. या दोघांच्या विरोधात अपराध लपवण्यासाठी पुरावे मिटवण्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. सिस्टर अभया यांना न्याय मिळण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे आता हयात असलेले एकमेव सदस्य आणि मानवाधिकार कार्यकर्ते जोमोन पुथेनपुराकल म्हणाले, ‘‘सिस्टर अभया यांना शेवटी न्याय मिळाला. आता त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. तुमच्याकडे पैसा आणि अमर्याद अधिकार असले, तरी तुम्ही न्यायाशी खेळू शकत नाही, हे या प्रकरणातून दिसून आले.’’
गुन्हे शाखेतील संबंधितांवर कारवाई करा !या प्रकरणातील प्राथमिक अन्वेषण पोलिसांनी आणि नंतर गुन्हे अन्वेषण शाखेने केला. त्यांनी ‘सिस्टर अभया यांनी आत्महत्या केली’, असा अहवाल सादर केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. पुराव्यांशी छेडछाड करून गुन्हेगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणार्या संबंधितांवर कारवाई हवी ! या प्रकरणी पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखा कुणाच्या सांगण्यावरून वागत होती, याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे ! |