राहुल गांधी यांच्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्याने त्यांचा आभारी आहे ! – आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांची उपरोधिक टीका

हिमंत सरमा यांनी सांगितलेला प्रसंग खरा असेल, तर काँग्रेसमध्ये गांधी घराण्याकडून पक्षाच्या नेत्यांचा किती मान राखला जातो, हे स्पष्ट होते !

उपचाराच्या वेळी कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यामुळे धर्मांध नातेवाइकांकडून डॉक्टरला मारहाण !

भाजपच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

ज्या ठिकाणी हिंदू रहातात त्या ठिकाणी गोमांस वर्ज्य केले जावे ! – आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा

गाय आपली माता आहे. हिंदू गायींची पूजा करतात. बंगालमधून आम्ही गायींची तस्करी होऊ देणार नाही. ज्या ठिकाणी हिंदू रहातात त्या ठिकाणी गोमांस वर्ज्य केले जावे.

आसाममध्ये चकमकीत ८ आतंकवादी ठार

आसाम-नागालँडच्या सीमेवरील पश्‍चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ‘दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी’ या आतंकवादी संघटनेच्या ८ आतंकवाद्यांना ठार केले. या आतंकवाद्यांकडून ४ एके ४७ रायफली आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.

आसाममध्ये ३ आमदारांनी घेतली संस्कृतमधून शपथ !

विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घेतली. यांतील ३ सदस्यांनी संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली.

आसाममध्ये भाजपकडून अल्पसंख्यांक मोर्चाच्या सर्व शाखा विसर्जित !

भाजपने अल्पसंख्यांकांची मते मिळण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अधिकाधिक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंची मते कशी मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

करीमगंज (आसाम) येथील मंदिरात दरोडा टाकणार्‍या १२ धर्मांधांच्या टोळीला अटक !

धर्मांधांची लुटारू टोळी धनाढ्य इस्लामी संघटनांची कार्यालये किंवा मशिदी यांठिकाणी दरोडा टाकत नाहीत, तर मंदिरांवर दरोडा घालतात. यातून त्यांची धर्मांधता दिसून येते !

आसाममध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

आसाममध्ये २८ एप्रिलला सकाळी भूकंपाचे एका मागोमाग एकूण ५ तीव्र धक्के बसले. ६.४ रिक्टर स्केल एवढे तीव्रतेचे हे धक्के होते. जवळपास अर्धा मिनिट हे धक्के जाणवत होते.

आसाममध्ये हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणार्‍या ५ धर्मांधांना अटक

हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात अब्दुल बरेक, अबुल होसेन, अब्दुल जब्बार, आबेदा खातून आणि बादशाह अली यांना अटक करण्यात आली.

आसाममध्ये नरसिंह मंदिरात चोरी !

बलिया गावामध्ये १० एप्रिल या दिवशी नरसिंह मंदिरातील पुजार्‍याच्या कुटुंबियांना मारहाण करून मंदिरातील सोन्याचे दागिने आणि रोख १ लाख रुपये दरोडेखोरांनी पळवून नेले. बलिया गाव बांगलादेशाच्या सीमेला लागून आहे.