उपचाराच्या वेळी कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यामुळे धर्मांध नातेवाइकांकडून डॉक्टरला मारहाण !

२४ जणांना अटक * एक महिलेचाही समावेश

  • भाजपच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
  • या घटनेविषयी तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप आदी राजकीय पक्ष, तसेच पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी गप्प का आहेत ?

गौहत्ती (आसाम) – आसामच्या होजाई जिल्ह्यातील एका कोविड केअर सेंटरमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्याच्या धर्मांध नातेवाइकांनी येथील डॉ. सेजुकुमार सेनापती यांना सेंटरमध्ये घुसून मारहाण केली, तसेच या सेंटरची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी महंमद कमरुद्दीन, महंमद जैनलुद्दीन, रेहनुद्दीन, सईदुल आलम, रहीमुद्दीन, राजुल इस्लाम, तैयबर रहमान, साहिल इस्लाम यांच्यासहित २४ धर्मांधांना अटक केली आहे. यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या घडनेनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याचे, तसेच अशांना कठोर शिक्षा करण्याचे आवाहन केले आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी आरोपींवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. सरमा यांनी म्हटले की, वैद्यकीय कर्मचार्‍यांवर होणारी आक्रमणे प्रशासन सहन करणार नाही.