रांगिया (आसाम) येथे अज्ञातांनी फडकावलेला पाकचा राष्ट्रध्वज स्थानिकांनी जाळला !

विरोधकांनी याला भाजपच उत्तरदायी असल्याचा आरोप केला. भाजप राज्यात धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला; मात्र हा झेंडा नेमका कुणी लावला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आसाममध्ये भाजपच्या उमेदवाराच्या गाडीमध्ये ई.व्ही.एम्. यंत्र आढळल्याने ४ अधिकारी निलंबित

विशेष म्हणजे गाडी भाजपचे आमदार आणि सध्याचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची आहे, असे सांगण्यात येत आहे. यानंतर निवडणूक आयोगाने संबंधित ४ अधिकार्‍यांना निलंबित केले आहे.

रांगिया (आसाम) येथे अज्ञातांनी फडकवलेला पाकचा राष्ट्रध्वज स्थानिकांनी जाळला !

राज्यात विधानसभा निवडणुक चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर रांगियामधील गोरुकुची भागामध्ये अज्ञातांनी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला पाकचा राष्ट्रध्वज फडकवला.

आसाममध्ये भाजपच्या उमेदवाराच्या गाडीमध्ये इ.व्ही.एम्. यंत्र आढळल्याने ४ अधिकारी निलंबित

आसामच्या पाथरकंडी विधानसभा क्षेत्रात एका पांढर्‍या रंगाच्या बोलेरो गाडीमध्ये ई.व्ही.एम्. (इलेक्ट्रिक व्होटिंग मशीन) यंत्र आढळून आले आहे. विशेष म्हणजे गाडी भाजपचे आमदार आणि सध्याचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची आहे, असे सांगण्यात येत आहे.

आसाममध्ये पुन्हा सत्तेत आल्यास ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदे करू ! – अमित शहा यांचे आश्‍वासन

केवळ आसामसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी असे कायदे केंद्र सरकारने केले पाहिजेत ! इतकेच नव्हे, तर समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतर बंदी कायदा आदी कायदेही करणे आवश्यक आहेत !

आसाम आणि मध्यप्रदेश येथे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या

भाजपशासित राज्यांत त्यांच्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होणे, अपेक्षित नाही ! देशातील सर्वच हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण होण्यासाठी केंद्र आणि भाजपशासित राज्यांच्या सरकारांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असे हिंदूंना वाटते !

ईशान्य भारतातील आतंकवाद्यांना शस्त्रपुरवठा करणार्‍या साजिद अली याला अटक

आतंकवाद्यांनाच नाही, तर त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करणार्‍यांनाही फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे !

आसाममधील ‘एआययूडीएफ’च्या ‘अजमल फाऊंडेशन’ला विदेशी जिहादी संघटनांकडून मिळाल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या ! – ‘लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी’चा दावा

‘लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी’ या संस्थेला अशी माहिती मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या केंद्र सरकारला का मिळत नाही ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !

आसाम सरकार ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कायदा करत आहे ! – अर्थमंत्री हिमंत बिस्वा सरमा

केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !

धार्मिक टोपी घातल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलंबित

आसाम पोलिसांच्या बिनतारी संदेश वहन विभागातील उपनिरीक्षक महंमद शौकत अली याला कामावर असतांना धार्मिक गोल टोपी घातल्याच्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.