श्रीनगर – काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील भद्रवाह येथील शिक्षक डॉ. वारीस अली याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. अली याने १२ वीत शिकणार्या विद्यार्थिनीला ‘माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा तुला परीक्षेत नापास करीन’, अशी धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. या प्रकरणी विद्यार्थिनीने १६ एप्रिल या दिवशी त्याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
विद्यार्थिनीने म्हटले आहे की, ‘अली याने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यास तो तिला पंजाबमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यास साहाय्य करील, असे मला सांगितले. तसेच त्याने विद्यार्थिनीला व्हॉट्सॲपवर काही अश्लील मसंदेशही पाठवले होते. त्याने अन्य विद्यार्थिनींकडेही शारीरिक संबंधांची मागणी केली होती, असे पीडित विद्यार्थिनीने म्हटले आहे. ‘जर याविषयी कुटुंबियांना सांगितले किंवा संबंध ठेवण्यास नकार दिला, तर तुला परीक्षेत नापास करीन’, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली होती.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना भर चौकात फासावर लटकवण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |