Ramji Lal Suman On Agra Rape Case : (म्हणे) ‘अखिलेश यादव यांनी येऊन पीडित कुटुंबाची भेट घ्यावी, एवढे हे मोठे प्रकरण नाही !’

  • समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांचे वादग्रस्त आणि असंवेदनशील विधान

  • आगरा (उत्तरप्रदेश) येथील बालिकेवरील अत्याचाराचे प्रकरण

समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन व पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव

खेरागढ (आगरा) – येथील एका बालिकेवर झालेल्या अत्याराच्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे खासदार रामजी लाल सुमन यांनी ‘अखिलेश यादव यांनी येऊन पीडित कुटुंबाची भेट घ्यावी, एवढे हे मोठे प्रकरण नाही’, असे वादग्रस्त आणि असंवेदनशील विधान केले. ते २० एप्रिलला पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात हे वादग्रस्त विधान केले. येथील एका गावात १७ एप्रिलला रात्री एका दलित समाजाच्या बालिका तिच्या वडिलांसह एका कार्यक्रमाला गेले होते. तेथे गावातील रहिवासी असलेला ओमवीर लोधी याने रात्री १ वाजता घराबाहेर झोपलेल्या बालिकेचे अपहरण करून तिला दूर घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी आवाज उठवला. यानंतर पोलिसांनी आरोपीला फत्तेहपूर सिकरी येथून अटक केली.

२० एप्रिलला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खसदार सुमन हे पक्षाच्या अन्य नेत्यांसह पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले. तेथे त्यांनी पीडितेच्या वडिलांशी २० मिनिटे एकांतात चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना पत्रकारांनी त्यांना ‘तुमच्या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी येणार का ?’, असा प्रश्न विचारला. यावर खासदार सुमन म्हणाले, ‘‘तुम्ही काय लहान मुलांसारखे बोलत आहात ? हे एवढे मोठे प्रकरण नाही. या कुटुंबाला आम्ही शक्य ते साहाय्य करू. अखिलेश यादव यांनी येथे येण्याची आवश्यकता नाही.’’

संपादकीय भूमिका

  • अशांच्या राजवटीत कधी महिला सुरक्षित रहातील का ? महिला आयोगाने अशांवर कठोर कारवाई केली पाहिजे, तरच असे विधान पुन्हा कुणी करू धजावणार नाहीत !
  • अशांना आता कुणी महिलाविरोधी का म्हणत नाही ?