दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल)
अलीगड (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील संभल, बागपत, बदायू, फिरोजाबाद, बरेली यांसारख्या शहरांमध्ये आताच्या मशिदी पूर्वीची मंदिरे असल्याच्या घटना समोर येत असतांना आता अलीगड येथील जामा मशिदीच्या संदर्भातही न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.
१. माहिती अधिकार कार्यकर्ते आणि ‘भ्रष्टाचारविरोधी सेवा’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित केशव देव गौतम यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. यावर येत्या १५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
२. पंडित केशव देव गौतम म्हणाले की, येथे हिंदु राजांचा एक मोठा किल्ला होता. काही लोकांनी बनावट कागदपत्रे सिद्ध करून या जागेवर जामा मशीद बांधली. याविषयी आम्ही माहिती अधिकारांतर्गत पुरातत्व विभागाकडून माहिती मागितली. पुरातत्व विभागाने माहिती दिली आहे की, पूर्वी जामा मशिदीच्या ठिकाणी बौद्ध स्तूप, जैन मंदिर किंवा शिवमंदिर होते. या आधारे याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकादेशातील बहुतेक जुन्या मशिदींच्या ठिकाणी पूर्वी हिंदु मंदिरे होती, असेच आता जनतेला वाटू लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेच आता या मशिदींचा इतिहास शोधण्यासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावे आणि खरी माहिती जनतेसमोर आणावी ! |