BMC On Huge Hoardings : ३०६ पैकी १०३ भव्य फलक कुणी बसवले, याची माहिती उपलब्ध नाही !

  • मुंबई महापालिकेचे दायित्वशून्य उत्तर !

  • माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवली होती माहिती

मुंबई : मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या भूमींवर एकूण ३०६ होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत; मात्र त्यांतील १०३ होर्डिंग्ज कुणी बसवले, याची माहिती आमच्याकडे नाही, असे दायित्वशून्य उत्तर महानगरपालिकेने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर दिले. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेला विचारली होती.

वर्ष २०२४ मध्ये घाटकोपर येथे रेल्वेच्या मालकीच्या भूमीवरील भलेमोठे होर्डिंग्ज कोसळून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या होर्डिंग्जला संमती कशी मिळाली, यावरून महानगरपालिका आणि रेल्वे, तसेच सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) या यंत्रणेत वाद झाले होते. त्यामुळे या संदर्भात माहिती मागवण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

असे उत्तर महापालिका कसे देऊ शकते ? हे होर्डिंग्ज (भव्य फलक) कुणी बसवले, याचा तातडीने शोध घेऊन त्याची माहिती मुंबईकरांना महापालिकेने द्यायला हवी ! तसेच अशा प्रकारे बेकायदेशीर होर्डिंग्ज उभारणार्‍यांवर आणि ते उभारेपर्यंत झोपा काढणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !