Navapur Missionaries Encroachment : नवापूर (जिल्हा नंदुरबार) येथील अवैध चर्चविषयी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी धरणे आंदोलन !

१७ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण !

श्री. उमेश मंजी गावित

नंदुरबार (वार्ता.) : नवापूर तालुक्यात येणार्‍या ११६ ग्रामपंचायतींच्या हद्दीत, तसेच नवापूर शहरात गेल्या ८ ते १० वर्षांत मोठ्या प्रमाणात चर्चची अवैधरित्या बांधकामे करण्यात आलेली आहेत. याविषयीची माहिती घेण्यासाठी तालुक्यातील श्री. उमेश मंजी गावित यांनी ९ डिसेंबर २०२४ या दिवशी विस्तार अधिकार्‍यांकडे माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती अर्ज प्रविष्ट केला; पण पूर्ण माहिती उपलब्ध करून न दिल्याने श्री. गावीत यांनी नवापूर तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू केले आहे. १७ फेब्रुवारी या दिवशी ते कार्यकर्त्यांसमवेत आमरण उपोषण चालू करतील.

नवापूर शहर आणि तालुक्यातील गावात मोठ्या प्रमाणात अनेक चर्चची बांधकामे मागील काही वर्षांत चालू करण्यात आली. काही चर्च ग्रामपंचायतीच्या गायरान (गायींच्या चाऱ्यासाठी राखीव असलेली भूमी) भूमींवर बांधण्यात आली आहेत.

Aadivasi Protest | नवापूरमध्ये आदिवासींनी पुकारले आंदोलन | Marathi News

(सौजन्य : Jai Maharashtra News)

त्याचप्रमाणे काही चर्च सरकारी भूमींवर, काही चर्च तर कोणतीही आवश्यक अनुमती न घेता अवैधपणे बांधलेली आहेत. याविषयी माहिती मिळवण्यासाठी २ महिने प्रयत्न करूनही ११६ गावांपैकी काहीच गावांनी अत्यंत त्रोटक माहिती दिली आहे. बहुसंख्य गावांनी माहिती देण्याचे टाळले आहे. अवैध बांधकामाचे पितळ उघडे पडेल, या भीतीनेच अशी माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे, तसेच शासनाचा लाखो रुपयांचा महसूल यामुळे बुडवला जात आहे, असे आरोपही श्री. गावित यांनी केले आहेत.

संपादकीय भूमिका

  • गावे आणि शहरे यांच्या हद्दीमध्ये अवैध चर्च बांधण्यात कशी आली ? प्रशासन झोपले होते का ?
  • अवैध चर्चविषयी माहिती देण्यास टाळाटाळ होते, याचा अर्थ येथे भ्रष्टाचार झाला आहे. अशी माहिती लपवणे आणि ती मिळण्यासाठी नागरिकांना आमरण उपोषणासाठी बसावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
  • आतापर्यंत ‘लँड जिहाद’ आपल्याला ठाऊक होता. आता ख्रिस्तीही हिंदू आणि प्रशासन यांच्या भूमी कशा बळकावत आहेत, हे यातून दिसून येते !