हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्‍ह्यातील प्रशासकीय कार्यालय, तसेच पोलीस ठाणे येथे निवेदन !

शासनाने बंदी घातलेले प्‍लास्‍टिकचे ध्‍वज विक्री करणार्‍या विक्रेत्‍यांवर कारवाई करून राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पुणे, तसेच भोर येथील जिल्‍हाधिकारी कार्यालय, तसेच पोलीस प्रशासन यांना देण्‍यात आले.

प्‍लास्‍टिकचे राष्‍ट्रध्‍वज विकणार्‍यांवर गुन्‍हे नोंद करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने विविध ठिकाणी प्‍लास्‍टिकच्‍या राष्‍ट्रध्‍वजाची सर्रासपणे विक्री करण्‍यात येते. प्‍लास्‍टिकच्‍या वापरावर राज्‍यशासनाची बंदी आहे. त्‍याचसमवेत राष्‍ट्रध्‍वजाचा होणारा अवमान रोखण्‍यासाठी अशा विक्रेत्‍यांवर गुन्‍हे नोंद करण्‍यात यावेत.

खाली पडून खराब झालेल्या राष्ट्रध्वजासमवेत सन्मान पेटी जिल्हाधिकार्‍यांना सुपुर्द !

२६ जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वज सन्मान पेटीमध्ये विद्यार्थी, तसेच जागरूक नागरिक यांनी राष्ट्रध्वज गोळा केले. ते राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी कार्यालयात दुसर्‍या दिवशी जमा करण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखा !’ चळवळ

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देहली, फरिदाबाद आणि मथुरा येथे शहर दंडाधिकारी, जिल्‍हाधिकारी, साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त अशा विविध प्रशासकीय स्‍तरांवर निवेदन देण्‍यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते आणि अनेक धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

उत्तरप्रदेशातील नोएडा आणि मथुरा येथे प्रशासनाला निवेदन सादर

२६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने येथील शहर दंडाधिकारी कार्यालय आणि मथुरा येथील नगर अधिकारी सौरभ दुबे यांना निवेदन सादर करण्‍यात आले.

जालना येथे साडेचार मासांत २ वेळा राष्ट्रध्वज पालटावा लागला !

येथील रेल्वेस्थानकाच्या समोर १०० फूट उंचीवर डौलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत दिसत असल्यामुळे राष्ट्रभक्त संतप्त झाले आहेत. १६ ऑगस्ट २०२२ या दिवशी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या ध्वजाचे अनावरण झाले होते.

सुराज्य निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिन साजरा करतांना आपली वैभवशाली परंपरा युवा पिढीसमोर ठेवणे आवश्यक आहे.

पुणे शहरात इतरत्र पडलेले ध्वज ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ या मोहिमेतून गोळा केले !

ध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी ध्वज संकलन करणार्‍या आस्थापनाचे अभिनंदन ! नागरिकांनी ध्वज रस्त्यावर इतरत्र फेकणे अयोग्य आहे. यातून नागरिकांमध्ये देशप्रेम निर्माण करणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची ‘ध्वज संकलन’ मोहीम

राष्ट्रध्वजाचा चुकूनही अवमान होऊ नये, या हेतूने त्यांचे संकलन करण्याचा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा स्तुत्य कार्यक्रम !

सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये लोकप्रतिनिधी यांना निवेदने !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहिमे’च्या अंतर्गत ३२ शाळा, ६ महाविद्यालये, ४ लोकप्रतिनिधी, ८ पोलीस ठाण्यात, तसेच ६ ठिकाणी प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.