खाली पडून खराब झालेल्या राष्ट्रध्वजासमवेत सन्मान पेटी जिल्हाधिकार्‍यांना सुपुर्द !

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम’ !

यवतमाळ, ३० जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीने २६ जानेवारीला राबवलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेअंतर्गत खराब झालेले, खाली पडलेले राष्ट्रध्वज ‘सन्मान पेटी’मध्ये जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

उपजिल्हाधिकार्‍यांकडे राष्ट्रध्वज सन्मान पेटी सुपुर्द करतांना समितीचे कार्यकर्ते

२६ जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वज सन्मान पेटीमध्ये विद्यार्थी, तसेच जागरूक नागरिक यांनी राष्ट्रध्वज गोळा केले. ते राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी कार्यालयात दुसर्‍या दिवशी जमा करण्यात आले. या वेळी उपजिल्हाधिकारी दुबे यांनी ही पेटी स्वीकारली. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.