हिंदु जनजागृती समितीची ‘राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखा !’ चळवळ

देहली, फरिदाबाद आणि मथुरा येथे प्रशासनाला निवेदन सादर

देहली – २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देहली, फरिदाबाद आणि मथुरा येथे शहर दंडाधिकारी, जिल्‍हाधिकारी, साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त अशा विविध प्रशासकीय स्‍तरांवर निवेदन देण्‍यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते आणि अनेक धर्मप्रेमी उपस्‍थित होते.