प्‍लास्‍टिकचे राष्‍ट्रध्‍वज विकणार्‍यांवर गुन्‍हे नोंद करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांना निवेदन देतांना उपस्‍थित राष्‍ट्रप्रेमी

कराड, १० ऑगस्‍ट (वार्ता.) – स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने विविध ठिकाणी प्‍लास्‍टिकच्‍या राष्‍ट्रध्‍वजाची सर्रासपणे विक्री करण्‍यात येते. प्‍लास्‍टिकच्‍या वापरावर राज्‍यशासनाची बंदी आहे. त्‍याचसमवेत राष्‍ट्रध्‍वजाचा होणारा अवमान रोखण्‍यासाठी अशा विक्रेत्‍यांवर गुन्‍हे नोंद करण्‍यात यावेत, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने येथील नायब तहसीलदार आनंदराव देवकर, तसेच शहर पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक प्रताप सूर्यवंशी, ग्रामीण पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्‍या कार्यालयात देण्‍यात आले.

या वेळी समितीचे सर्वश्री अनिल कडणे, चेतन देसाई, मदन सावंत, सनातन संस्‍थेचे सर्वश्री लक्ष्मण पवार, चिंतामणी पारखे, शुभम वडणगेकर, धर्मप्रेमी सुमित पवार, किरण तांबेरे आदी हिंदुत्‍वनिष्‍ठ उपस्‍थित होते.