श्रीराममंदिरासाठी रचला जात आहे ४४ थरांचा पाया !
श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिराचे काम वेगाने चालू आहे. सध्या मंदिराच्या पायाभरणीचे काम चालू आहे. मंदिरासाठी ४४ थरांचा पाया रचला जात आहे. आतापर्यंत ६ थरांचे काम पूर्ण झाले आहेे, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली.