उत्तरप्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पात अयोध्येसाठी ४०४, तर काशीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

सौजन्य:टाईम्स नाऊ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात आला असून तो एकूण ५ लाख ५० सहस्र २७० कोटी रुपयांचा आहे. यात श्रीरामजन्मभूमी मंदिरापर्यंत पोचण्यापर्यंतच्या मार्गासाठी ३०० कोटी, तर अयोध्येच्या विकासासाठी १०४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज काशीमध्ये पर्यटन विकासासाठी १०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे.