Global Recession : जगात मंदी आधीच आली आहे ! – लेखक रॉबर्ट कियोसाकी

रॉबर्ट कियोसाकी

वॉशिंग्टन (अमेरिका) – जगात मंदी आधीच आली आहे, लोक कुठल्या भ्रमात आहेत ?, असा प्रश्न सुप्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या ‘एक्स’वर पोस्ट करत उपस्थित केला. कियोसाकी हे ‘रिच डॅड पुअर डॅड’ या पुस्तकाचे लेखक आहेत.

कियोसाकी पुढे म्हणाले की,

जग मंदीत आहे. मी वर्ष २०१२ पासून लोकांना सावध करत आहे. महागाई वाढत आहे, ही वस्तूस्थिती आहे. बेरोजगारीही वाढत आहे. ही मंदी तुम्हाला श्रीमंत करेल कि गरीब ?’ शिकण्यास आणि पालट करण्याची वेळ अद्यापही गेलेली नाही. लोकांनी यू ट्युबसारख्या सामाजिक माध्यमांचा वापर करून शिक्षित व्हावे. तथापि फसव्या आर्थिक सल्लागारांपासून सावध रहावे. सर्वांत चांगले आणि सर्वांत वाईट शिक्षण विनामूल्य आहे. लोकांनी काळजी घ्यावी आणि या मंदीला तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बनवावे.