|
तेहरान (इराण) – इराणला सुमारे ५० सहस्र अमेरिकी सैनिकांनी चारही बाजूंनी घेरले आहे, अशी माहिती स्वतः इराणनेच दिली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या एका उच्चस्तरीय कमांडरने अमेरिकाला चेतावणी देतांना म्हटले, ‘या भागातील अमेरिकी सैन्य काचेच्या घरात बसले असून त्यांनी इतरांवर दगडफेक करू नये.’ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिल्यानंतर त्यांनी ही चेतावणी दिली आहे. ‘इराणने त्याच्या अणू कार्यक्रमाच्या संदर्भातील नवा करार करण्यास नकार दिल्यास बाँबफेकीला सामोरे जावे लागेल’, अशी चेतावणी ट्रम्प यांनी दिली होती. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघई यांनी ‘एक्स’वरून म्हटले आहे की, ट्रम्प यांची बाँबस्फोटाची धमकी देशाच्या जागतिक शांतता आणि सुरक्षा यांसाठी लज्जास्पद आहे.