पुणे येथे लग्नाचे आमीष दाखवून तरुणीवर वारंवार शारीरिक अत्याचार

प्रतिकात्मक चित्र

पुणे – तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नाचे आमीष दाखवून वारंवार संबंध ठेवले. त्यातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर गोळ्या देऊन गर्भपात केला. या प्रकरणी करण नवले यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडितेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. करण हा भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री नवले यांचा मुलगा आहे.

पीडितेला करण याचे इतर मुलींशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. त्यातून वाद झाले. त्यात करणने पीडितेला मारहाण केली. पीडितेने झालेला सर्व प्रकार करणच्या आईला सांगितला. करणच्या आईनेच पीडितेला ‘तू माझ्या मुलाचे वाटोळे केले आहे. तुझ्यापर्यंत पोचायला मला ५ मिनिटे लागतील. तू या परिसरात रहायचे नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील’, अशी धमकी दिली. (धर्मशिक्षणाच्या अभावी धर्माचरण न करणारे नीतीमत्ताहीन युवक आणि त्यांना पाठीशी घालणारे पालक यांना ही दु:स्थिती दूर करण्यासाठी कठोर शिक्षा हवी. – संपादक) पीडिता दुसर्‍यांदा गर्भवती राहिल्यावर दबाव टाकल्यावर १६ फेब्रुवारी २०२५ मध्ये आळंदीमध्ये लग्न केले, असे पीडितेने तक्रारीमध्ये नमूद केले आहे.