Imran Khan Nobel Nominee : पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. सध्या इम्रान खान राष्ट्रीय तिजोरीत गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली कारावासात आहेत. नॉर्वे येथील राजकीय पक्ष ‘पार्टीट सेंट्रम’शी संबंधित ‘पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स’ने पाकिस्तानमध्ये मानवी हक्क आणि लोकशाहीला प्रोत्साहन देण्यासाठी इम्रान खान यांच्या नामांकनाची घोषणा केली. विशेष म्हणजे वर्ष २०१९ मध्येही नामांकन इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानाला शांततेसाठी नोबेल पुरस्काराचे नामांकन मिळणे, याहून मोठा विनोद म्हणता येणार नाही !