श्रीराममंदिरासाठी रचला जात आहे ४४ थरांचा पाया !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिराचे काम वेगाने चालू आहे. सध्या मंदिराच्या पायाभरणीचे काम चालू आहे. मंदिरासाठी ४४ थरांचा पाया रचला जात आहे. आतापर्यंत ६ थरांचे काम पूर्ण झाले आहेे, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली. ते येथे काम पहाण्यास आले असता ‘मंदिराच्या पायाभरणीचे काम येत्या ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाईल’, अशी माहिती त्यांनी दिली.

१. ‘तौक्ते’ आणि ‘यास’ चक्रीवादळांमुळे झालेल्या पावसामुळे येथील काम काही दिवस बंद होते. १ जूनपासून ते पुन्हा चालू झाल आहे.

२. श्रीराममंदिराच्या पायाभरणीसाठीच्या खोदकामातून निघालेल्या मातीला घरोघरी पोचवण्याचे काम चालू करण्यात आले होते. प्रतिदिन रामललाचे दर्शन करण्यासाठी येणारे भाविक येथील माती समवेत घरी घेऊन जात होते; पण कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून भाविक येणे बंद झाले आहे.