आम्हाला बाबरी नाही, तर श्रीरामजन्मभूमीची आवश्यकता ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
आम्हाला आता बाबरी मशिदीची आवश्यकता नाही. आम्हाला आता श्रीरामजन्मभूमी पाहिजे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी येथे प्रसारसभेत केले. कर्नाटक राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून प्रचारास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री सरमा बोलत होते.