Husband Wife Case : पती शारीरिक संबंध ठेवत नसल्याचा पत्नीचा आरोप : न्यायालयाकडून घटस्फोटाचा आदेश

पतीच्या धार्मिकतेमुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाल्याचा पत्नीचा आरोप

थिरूवनंतपूरम् (केरळ) – पती शारीरिक संबंध ठेवत नसल्याचा पत्नीचा आरोप मान्य करत केरळ न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा घटस्फोटाचा आदेश कायम ठेवला. या जोडप्याचे वर्ष २००६ मध्ये नोंदणीद्वारे विवाह झाला होता. काही काळानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला होता. ‘पती फार धार्मिक असल्यामुळे दुरावा आला’, असा पत्नीने आरोप केला आहे. पत्नीने आरोप करतांना म्हटले की, ‘माझा पती दिवसभर प्रार्थना आणि पूजेमध्ये व्यस्त असतो. तो मंदिर आणि आश्रमात जातो. पतीने मलाही त्याच्यासारखे आध्यात्मिक बनवण्याचा प्रयत्न केला.’

पत्नीला आध्यात्मिक जीवन स्वीकारण्यास भाग पाडणे, ही मानसिक क्रूरता !

न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, विवाह एका जोडीदाराला दुसर्‍या जोडीदाराच्या वैयक्तिक श्रद्धा, मग ती आध्यात्मिक असो किंवा इतर काही असो, यावर आदेश देण्याचा अधिकार देत नाही. पत्नीला तिचे आध्यात्मिक जीवन स्वीकारण्यास भाग पाडणे आणि तिला भावनिक त्रास देणे, ही मानसिक क्रूरता आहे. कौटुंबिक जीवनात पतीची अनास्था, हे त्याचे वैवाहिक कर्तव्ये पार पाडण्यात अपयश दर्शवते.