सोलापूर येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पोलीस आणि प्रशासनाला निवेदन

सोलापूर, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – देहली शहरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा यांची क्रूरपणे हत्या करणार्या जिहादी आक्रमणकर्त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन दिनांक १५ फेब्रुवारी या दिवशी सोलापूर पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या वेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू महासभा, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदुराष्ट्र सेना, श्रीराम सेना, जगदंब प्रतिष्ठान, एल.आर्.जी. प्रतिष्ठान आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने देशभर निधी समर्पण अभियान चालू झाले. हे कार्य देहली येथे रिंकू शर्मा करत होते; पण काही जिहादी त्यांना निधी संकलन करण्यास विरोध करत होते. याची माहिती रिंकू शर्मा यांनी पोलीस प्रशासनाला देऊनही पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करून जिहाद्यांना पाठीशी घातले. परिणामी त्या जिहाद्यांनी रिंकू शर्माची क्रूर हत्या केली. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे हा भयानक प्रकार घडला आहे.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक