२ सहस्र ५०० कोटी रुपये जमा
मंदिराला लागणार्या पैशांपेक्षा अधिक गोळा झालेल्या रकमेचा व्यय देशातील जीर्णावस्थेत असलेल्या प्राचीन आणि मोठ्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी करावा, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी धर्मशिक्षण देणारी केंद्रे उघडावीत, असेच हिंदूंना वाटते !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिरासाठी देणगी गोळा करण्याचे अभियान थांबवण्यात आले आहे, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून देण्यात आली आहे. या मंदिरासाठी १ सहस्र १०० कोटी रुपयांची आवश्यकता असतांना २ सहस्र ५०० कोटी रुपये देगणीतून गोळा झाले असल्याने हे अभियान थांबवण्यात आले आहे.
Door-to-door #collection for #RamMandir #construction stopped, Here’s how you can donate nowhttps://t.co/kuHLk832zP
— Zee News English (@ZeeNewsEnglish) March 6, 2021
श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, लोकांना जर आता देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाई पद्धतीने द्यावी. त्यासाठी ट्रस्टच्या संकेतस्थळावर ते जाऊ शकतात. मंदिराच्या समोरच्या बाजूची भूमी अधिग्रहित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची बोलणीही चालू आहे; मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही; पण येत्या ३ वर्षांमध्ये श्रीराममंदिराची उभारणी पूर्ण होईल.