वाघ्या श्वानाविषयी इतिहासतज्ञांची समिती नेमावी ! – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, भाजप

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, भाजप

सातारा, ३१ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच खरे वाघ होते. त्यामुळे वाघ्या श्वानाविषयी इतिहासतज्ञांची समिती नेमून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला खासदार भोसले यांनी अभिवादन केले, तेव्हा ते बोलत होते. भारतामध्ये राहून जे औरंगजेबाचे स्टेटस (स्टेटस म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांवरील स्वतःच्या खात्यावर प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण.) ठेवतात, ते या देशात रहाण्याच्या पात्रतेचे नाहीत. त्यांना देशाबाहेर हाकलून दिले पाहिजे.