पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये ! – राज ठाकरे

गेल्या ७० वर्षांत आतंकवादी आक्रमणांमुळे भारताची जी हानी झाली आहे, तीही परवडणारी नाही ! अशा पाकला कायमचा धडा शिकवणे, हाच भारतियांच्या संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे !

पुलवामामध्ये हुतात्मा झालेले सैनिक हे राजकीय व्यवस्थेचे बळी ! – राज ठाकरे यांचा आरोप

पुलवामा येथे हुतात्मा झालेले सैनिक हे राजकीय व्यवस्थेचे बळी आहेत. संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांची कसून चौकशी केल्यास धक्कादायक सत्य बाहेर येईल, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

इगतपुरी येथील उपाहारगृहावर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांना जामीन संमत

इगतपुरी येथील परप्रांतीय उपाहारगृहावर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमण केल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी न्यायालयाने जामीन संमत केला. यातील ६ आरोपींची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

या देशाला रामराज्याची आवश्यकता आहे ! – राज ठाकरे

भाजपला ‘होमग्राऊंड’मध्ये जागा दाखवणारे गुजरात हे पहिले राज्य होते. त्या निवडणुकीत झालेले मतदान आणि आता झालेल्या मतदान यांवरून भाजपला त्यांची जागा समजली आहे. या देशाला रामराज्याची आवश्यकता आहे, राम मंदिराची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीविषयी व्यक्त केले.

राममंदिराच्या सूत्रावर ओवैसींच्या साहाय्याने दंगली घडवण्याचा सरकारचा डाव ! – राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख

सरकारला हिंदु-मुसलमान दंगलींवर निवडणूक लढवायची आहे. यासाठी पुढच्या काही दिवसांत ओवैसीसारख्या लोकांशी संगनमत करून राममंदिराच्या सूत्रावरून दंगली घडवण्याचा डाव आखला आहे, अशी माहिती देहलीवरून दूरध्वनीच्या माध्यमातून समजली आहे

उत्तर भारत आणि बिहार येथील तरुणांचा स्वाभिमान कुठे आहे ? – राज ठाकरे

तुमचे उत्तर भारत आणि बिहार येथील नेते तुमच्यासाठी काम करत नाहीत. तुम्हाला रोजगारासाठी अन्य ठिकाणी जाऊन अपमानित व्हावे लागते. तुमचा स्वाभिमान कुठे आहे ?, असा प्रश्‍न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारत आणि बिहारच्या तरुणांना विचारला

दूध आंदोलनाला सरकार उत्तरदायी ! – राज ठाकरे

सरकारकडून दूधप्रश्‍नाविषयी आधीच बैठक बोलवायला हवी होती.  राज्य सरकारमधील लोक सांगकामे आहेत. बाहेरच्या राज्यातील ‘अमूल’ वगैरे दूध उत्पादकांना महाराष्ट्रात घुसवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

निवडणुकीत फंड मिळावा म्हणून प्लास्टिकबंदी केली का ? – राज ठाकरे यांची टीका

प्लास्टिक निर्माण करणार्‍या आस्थापनांकडून आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणून प्लास्टिकबंदी केली गेली नाही ना, अशी टीकात्मक शंका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केली.

राजकारणापलीकडे जाऊन रत्नागिरीतील भूमीचा विकास करा ! – राज ठाकरे

कोकणातील अनेक रत्ने ही रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे रत्नागिरीच्या या भूमीला एक वेगळी उंची आहे. अशा या भूमीमध्ये आपण काम करत असल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे.

आपण नाणारवासियांच्या समवेतच आहोत ! – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संघटनात्मक पातळीवरील राज्यव्यापी दौरा चालू असून ते २५ मे या दिवशी राजापूर येथे आले होते.


Multi Language |Offline reading | PDF