
मुंबई – राज ठाकरे यांना साहाय्य करण्यावर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सदा सरवणकर यांची समजूत काढतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही अमित ठाकरे यांचा प्रचार करू, असे वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे केले.
या वेळी प्रसाद लाड म्हणाले, ‘‘सदा सरवणकर अनेकदा जनतेतून निवडून विधानसभेवर गेले आहेत. या वेळी विधान परिषदेवर पाठवून त्यांची समजूत काढता येईल. एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढून त्यांना विधान परिषदेवर संधी द्यायला हवी. त्यांच्याकडे श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद ५ वर्षांसाठी देण्यात आले आहे. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून सदा सरवणकर आमची भूमिका मान्य करतील.’’