काँग्रेसच्या गेहलोत, कमलनाथ, पी. चिदंबरम् या नेत्यांनी पक्षापेक्षा मुलांची काळजी केली ! – राहुल गांधी यांचा उद्वेग

नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्‍यांना जो मार्ग दाखवला त्याच मार्गावरून त्यांचे नेते वाटचाल करत आहेत. त्यामुळेच नेत्यांकडूनही त्यांच्या मुलांचा विचार, घराणेशाहीचा विचार झाल्यावर गांधीघराण्याला उद्वेग का येत आहे ?

माझ्या विजयामुळे अधर्माचा नाश होईल ! – साध्वी प्रज्ञासिंह

असे विधान किती विजयी उमेदवार करतात ? हिंदूंना आतंकवादी ठरवणारे दिग्विजय सिंह यांचा साध्वी यांनी केलेला पराभव, म्हणजेच हिंदुद्वेष्ट्यांना चपराक !

‘चौकीदार चोर आहे’ म्हटल्याच्या प्रकरणी राहुल गांधी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात विनाअट क्षमायाचना

सर्वोच्च न्यायालयाच्या राफेल प्रकरणाविषयी फेरविचार करण्याच्या निर्णयावर निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका.

क्षमा मागण्यासाठी २२ पानांचे प्रतिज्ञापत्र का लागते ? – सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना फटकारले !

राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात सपशेल क्षमायाचना ! ‘सर्वोच्च न्यायालयही ‘चौकीदारच चोर आहे’, असे म्हणत आहे’, अशा केलेल्या विधानावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी २ वेळा न्यायालयात खेद व्यक्त केला होता; मात्र त्यांनी अखेर न्यायालयात क्षमायाचना केली.

ब्रिटीश नागरिकत्वाच्या सूत्रावरून राहुल गांधी यांना गृहमंत्रालयाची नोटीस

भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.

राफेल प्रकरणी राहुल गांधी यांच्याकडून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात खेद व्यक्त

राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही ‘ ‘चौकीदार चोर आहे’ असे मान्य केले आहे’, असे विधान केल्याच्या प्रकरणी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात खेद व्यक्त केला.

राहुल गांधी यांचे उत्तर समाधानकारक नसल्याने सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

‘मी चौकीदार आहे’ संदर्भातील विधानावर राहुल गांधी यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली  आहे. याचे उत्तर ३० एप्रिलपर्यंत मागवण्यात आले आहे.

‘चौकीदार चोर आहे’ या विधानाच्या प्रकरणात राहुल गांधी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात खेद व्यक्त

प्रथम न्यायालयाचा अवमान करायचा आणि नंतर खेद व्यक्त करून मोकळे व्हायचे ! असा चुकीचा पायंडा पडू नये, यासाठी न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावणे अपेक्षित आहे !

‘चौकीदार चोर आहे’ या विधानावरून न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी  राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

काही दिवसांपूर्वी राफेल विमाने खरेदी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ‘फेरविचार करणार’, असे म्हटले होते. त्या वेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलतांना ‘न्यायालयानेही ‘चौकीदार चोर आहे’, असे म्हटले आहे’, असे म्हटले होते.

(म्हणे) ‘माझे नरेंद्र मोदींवर प्रेम आहे !’ – राहुल गांधी

‘आय लव्ह नरेंद्र मोदी.’ मला त्यांच्याविषयी अजिबातच राग किंवा द्वेष नाही; पण ते माझ्यासारखा विचार करत नाहीत. त्यांना माझ्याविषयी राग आहे, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF