पुणे विशेष न्यायालयाकडून राहुल गांधी यांना जामीन संमत

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान प्रकरण

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना विशेष न्यायालयाने १० जानेवारी या दिवशी जामीन संमत केला आहे. या सुनावणीसाठी राहुल गांधी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे न्यायालयात उपस्थित होते. पुढील सुनावणी १८ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतियांसमोर केलेल्या भाषणामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या विरोधात सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात न्यायालयात मानहानीचा दावा प्रविष्ट (दाखल) केला होता.

खासदार-आमदार यांच्या विरोधातील दाव्यांची सुनावणी घेणार्‍या विशेष न्यायालयातील न्यायमूर्ती अमोल शिंदे यांच्या न्यायालयात ही सुनावणी चालू होती.