|

मुंबई – महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी या दिवशीच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर छत्रपती शिवाजी महाराजांना ‘श्रद्धांजली’ वाहिली आहे. या प्रकरणी भाजपने त्यांच्यावर टीका करत सांगितले, ‘‘शिवजन्मोत्सवाच्या दिवशी राहुल गांधी यांनी जाणूनबुजून छत्रपती शिवरायांना श्रद्धांजली देण्याचा विकृतपणा दाखवला आहे. महापुरुषांचा फक्त राजकीय लाभासाठी वापर करणे, ही काँग्रेसची घाणेरडी मानसिकता नेहमी जनतेसमोर उघड होते. या शिवद्रोही काँग्रेसला तमाम हिंदु बांधव कधीही माफ करणार नाहीत.’’
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी।
उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा। pic.twitter.com/1jOCYOkrC1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2025
जयंतीनिमित्त केल्या जाणार्या पोस्टमध्ये ‘आदरांजली’ असे म्हटले जाते; पण राहुल गांधी यांनी ‘श्रद्धांजली’ असे म्हटले. त्यांच्या पोस्टमधील छायाचित्रात राहुल गांधी शिवरायांची पूर्णाकृती मूर्ती हातात धरून उंचावून दाखवतांना दिसत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो आणि विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपले शौर्य आणि साहसाने त्यांनी आपल्याला निर्भीडपणा अन् समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे आयुष्य आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणास्रोत राहील.’’
Congress MP and Leader of opposition Rahul Gandhi’s blunder (Mumbai): Paid ‘Shraddhanjali’ (tribute) to Chhatrapati Shivaji Maharaj!
Criticism on social media over the post
Rahul Gandhi doesn’t even understand the difference between ‘Shraddhanjali’ (tribute to the deceased) and… pic.twitter.com/fqnoxmoECa
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 19, 2025
त्यांच्या या पोस्टवर सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
संपादकीय भूमिका
|