
१. अमेरिकेतील उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्या भारतविरोधी कारवाया
नाझींविषयी सहानुभूती असलेले, कुख्यात ‘शार्ट सेलर’ (समभागांची किंमत न्यून होण्याची अपेक्षा ठेवून त्यानुसार डाव खेळणारे गुंतवणूकदार) आणि खुल्या समाजाचे स्वयंप्रमाणित संरक्षक जॉर्ज सोरोस यांनी नरेंद्र मोदी सरकार अन् लोकशाहीच्या स्थितीचा विशिष्ट संदर्भ देत लोकशाहीची माता असलेल्या भारताच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. त्यामुळे त्यांच्या संशयास्पद कारवायांसाठी ते चौकशीच्या कक्षेत आहेत. अदानीविरोधी मोहिमेला त्यांनी दिलेला पाठिंबाही सर्वज्ञात आहे. संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या अगदी आधी भारत, मोदी सरकार किंवा काही व्यावसायिक सौदे आणि उद्योग यांना लक्ष्य करणारे काही अहवाल समोर येतात. हे अहवाल राजकीय वातावरण बिघडवतात आणि विधीमंडळाच्या कामात अडथळा आणतात.
२. सत्ताधारी भाजपकडून सोरोस आणि वंशवादी काँग्रेस यांच्यातील संबंध उघड
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने असहिष्णु सोरोस आणि वंशवादी काँग्रेस यांच्यातील संबंध उलगडत असतांना तीव्र शब्दांत आक्रमण केले आहे. त्यांनी ‘डीप स्टेट’शी संबंधित अनेक जागतिक समस्या आणि सत्ता पालटाचे संशयास्पद प्रयत्न यांचे दरवाजे उघडले आहेत. (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांचे गुप्त जाळे. या व्यवस्थेच्या द्वारे सरकारी धोरणे खासगी संस्थांना अनुकूल बनवली जातात.) अमेरिकन ‘डीप स्टेट’ आणि धोकादायक सोरोस टोळी हे दोघेही बांगलादेशातील लोकशाहीविरोधी अन् इस्लामी महंमद युनूस राजवटीचे समर्थन करतात. त्यामुळे हे आरोप आणखी भयावह आहेत.

३. सोरोस यांची नीती
जरी सोरोस हे बाजारात ‘एकाधिकारवादी’ म्हणून ओळखले जात असले आणि त्यांच्या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’चे अनुदानित कार्यकर्ते, प्रसारमाध्यमे, व्यक्ती स्वयंसेवी संस्था अन् विचारवंत इत्यादींचा वापर संपत्ती गोळा करण्यासाठी अन् कमकुवत, तसेच सौम्य सरकारांना साहाय्य करत आहेत. असे असले, तरी ते नेहमीच लोकशाहीच्या नावाखाली आणि स्वातंत्र्य अन् अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांसारख्या खुल्या समाजाच्या मूल्यांच्या नावाखाली हे करतात. ‘खुल्या समाजाच्या शत्रूं’चा कट्टर शत्रू म्हणून सोरोस आणि त्यांच्या वंशवादी संस्थेने कोणते देश लोकशाहीवादी आहेत अन् कोणते नाहीत, हे परिभाषित करण्याची भूमिका स्वीकारली आहे.
४. जगावर नियंत्रण ठेवण्याचे सोरोस यांचे प्रयत्न
अमेरिकन ‘डीप स्टेट’शी अजेंड्याचा (कार्यसूचीचा) पूर्णपणे समन्वय साधत, त्यांचा मूळ देश हंगेरीमधून हद्दपार केलेला आणि बंदी घातलेला अब्जाधीश वैयक्तिक लाभासाठी शासन पालटण्याच्या कार्यात स्वतःला गुंतवून घेतो. बांगलादेशात पाहिले, तर त्यांची बांधिलकी लोकशाहीसाठी किंवा खुल्या समाजासाठी नाही. संपत्ती गोळा करणे आणि जगावर नियंत्रण ठेवणे, या त्यांच्या अहंकाराचे समाधान करणे, हा त्यांचा दुहेरी उद्देश आहे. बांगलादेशात आज कट्टरपंथी राज्य करत आहेत आणि हिंदु, बौद्ध अन् ख्रिस्ती यांच्या मानवी हक्कांचा गैरवापर करणे, हे खुल्या समाजाचे लक्षण आहे का ?
भारतातील वंशवादी काँग्रेस पक्ष आणि सोरोस यांचे असलेले संबंध
भू-राजकीय घडामोडींशी या सत्तेसाठी भुकेल्या उद्योजकाची भूमिका आणि त्याचे असलेले संबंध हे अन्वेषणाखाली असल्याने नेहरू-गांधी कुटुंब, त्यांचा वंशवादी पक्ष आणि विश्वस्त संस्था यांच्याशी सोरोस यांच्याशी असलेल्या संबंधांविषयी स्वाभाविकपणे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इंदिरा गांधींच्या चुलत भावंडांपैकी एक असलेल्या दिवंगत ब्रज कुमार नेहरूंच्या पत्नी आणि काँग्रेसच्या राहुल गांधींची मावशी फोरी नेहरू यांच्याशी सोरोस यांचा विद्यापीठ काळातील संबंध होता, ही वस्तूस्थिती आहे. ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’चे जागतिक उपाध्यक्ष सलील शेट्टी, जे नागरिकत्व सुधारणा कायदाविरोधी आणि शेतकर्यांच्या आंदोलनात सक्रीय सहभागी होते. ते ऑक्टोबर २०२२ मध्ये कर्नाटकात गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत का आणि कसे सामील झाले ? भारतातील राजकीय सक्रियतेच्या आधी राहुल गांधींचे परदेश दौरे आणि ‘राफेल’ या लढाऊ विमानाच्या करारातील भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपांपासून ‘लोकशाही धोक्यात आहे’, इथपर्यंतच्या आख्यायिका त्याच सोरोसकडून अनुदानित स्रोत आणि विचारवंत यांच्याकडून कशा उद्भवल्या ? काँग्रेसचे वंशज पाश्चिमात्य देशांतील सोरोस प्रवर्तित संघटनांसमवेत बैठका का घेतात ? भारताच्या प्रादेशिक अखंडतेला लक्ष्य करणार्या ‘फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन द एशिया पॅसिफिक’ (एफ्.डी.एल्.ए.पी.) या संस्थेचे सहअध्यक्षपद सोनिया गांधी यांनी कायम का ठेवले ? जॉर्ज सोरोस यांचा निधी आणि काँग्रेसचा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी असलेला गुप्त करार एकमेकांशी जोडलेला आहे का ? हे आणि इतर अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. – प्रफुल्ल केतकर
५. माओवाद्यांच्या कृत्यांना प्रोत्साहन
सोरोस यांनी असहिष्णुता आणि अस्थिरता यांना चालना देणार्या युनूससारख्या शासनपद्धतींचे समर्थन केले आहे. ते ‘नागरी समाजाच्या’ नावाखाली माओवाद्यांच्या असभ्य कृत्यांना प्रोत्साहन देतात. न्यूयॉर्कमध्ये बसलेल्या या ‘जुन्या, श्रीमंत आणि धोकादायक’ अब्जाधीशाच्या कुप्रसिद्ध अभिमानास्पद अन् ज्ञात कृत्यांपैकी काही, म्हणजे वर्ष १९९२ मध्ये पाऊंड स्टर्लिंग, वर्ष १९९७ मध्ये थाई बाहट आणि वर्ष २०१३ मध्ये मलेशियन रिंगिट यांची किंमत न्यून झाल्याने खुलेपणा आणि स्वातंत्र्य यांची मूल्ये त्यांनी सुलभ केली नाहीत. लोकशाही राज्यघटना किंवा शरीयतचा प्रचार करणार्या इस्लामीवाद्यांना उलथवून टाकू इच्छिणारे अतीसाम्यवादी किंवा माओवादी हे सोरोस यांच्याकडून लाभ कमावण्याच्या आणि अहंकाराचे समाधान करणार्या उद्दिष्टांचे खरे लाभार्थी आहेत. संपत्ती गोळा करण्यासाठी ते त्यांचे गुरु कार्ल पॉपर यांच्या शिकवणीच्या विरुद्ध इतरांकडून त्यांची असहिष्णुता सहन करण्याची अपेक्षा करतात.
६. सार्वभौम भारताने लोकशाहीविरोधी आणि असहिष्णु शक्ती यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक !
भारताच्या संसदेत अदानी किंवा सोरोस हा चर्चेचा विषय असावा कि नाही, हा प्रश्न नाही. भारताची संसद परदेशी भूमीवरून चालवण्याची अनुमती दिली जावी कि नाही, हा एक योग्य प्रश्न आहे. काँग्रेस हा वंशवादाचा पक्ष आहे आणि सोरोस हे ज्यांना भारताची ऐतिहासिक अन् सांस्कृतिक वैशिष्ट्ये समजून घेण्याची, तसेच त्यांचे कौतुक करण्याची इच्छा नाही, असा असहिष्णु घटक आहे. युनूससारख्या राजवटीतील पालटामुळे हा संशयास्पद संबंध अधिक दृढ होत आहे का ? या लोकशाहीविरोधी आणि असहिष्णु शक्ती यांना आपण सार्वभौम भारतातील निवडणुकांचे निकाल अन् धोरणात्मक निर्णय ठरवू द्यायला हवे का ? आत्मविश्वास आणि दृढनिश्चयी भारत हा अन्य राष्ट्रांच्या समुदायामध्ये एक नवीन भूमिका शोधत आहे. भारत हा शाश्वत मूल्यांसह आध्यात्मिक लोकशाही आणि बंधुभावाचा संदेश पसरवत आहे.
आर्थिक आणि तांत्रिक प्रगती अन् सांस्कृतिक पुनरुत्थान या एकाच वेळी होणार्या दोन प्रक्रिया आहेत, ज्यासाठी भारतीय लोक हे लोकशाही यंत्रणेद्वारे प्रयत्नशील आहेत. अशा आकांक्षा उधळून लावण्याचा कोणताही प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला नाही पाहिजे. यामुळे स्वातंत्र्य आणि खुल्या समाजाच्या खर्या मूल्यांचा अपमान होईल. परदेशी वंशाच्या कथनांवरून देशाची दिशाभूल करण्याऐवजी वंशवादी काँग्रेसने सोरोस टोळीशी असलेल्या संशयास्पद संबंधांवर स्पष्टीकरण दिले पाहिजे. अन्यथा कोणत्याही मार्गाने राजकुमाराला राजा (राहुल गांधी यांना पंतप्रधान) बनवण्याच्या स्वप्नामध्ये पक्ष आणखी कलंकित होईल आणि भव्य जुन्या इतिहासाचा भाग बनेल.
लेखक : प्रफुल्ल केतकर, संपादक, साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’