अनेकदा साम्यवादी, पुरोगामी लोक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदु राष्ट्र’ हे देशासाठी आपत्ती ठरेल’, असे म्हटल्याचा एक दाखला देतात. त्यामुळे बाबासाहेबांनी नेमके काय म्हटले आहे आणि कोणत्या संदर्भात म्हटले आहे ?, ते समजून घेऊ.
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाष्य आणि साम्यवादी-पुरोगाम्यांनी दुष्टपणे केलेले चुकीचे भाषांतर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या पुस्तकात म्हणतात, ‘If Hindu Raj does become a fact, it will, no doubt, be the greatest calamity for this country. No matter what the Hindus say, Hinduism is a menace to liberty, equality and fraternity. On that account it is incompatible with democracy. Hindu Raj must be prevented at any cost.’
(संदर्भ : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे’, खंड ८, पान ३५८)
याचा खरा मराठी अनुवाद असा ‘जर हिंदू राज्य अस्तित्वात आले, तर देशासाठी ती फार मोठी आपत्ती ठरेल. हिंदू लोक काहीही म्हणत असले, तरी हिंदुइझम (हिंदुत्व नव्हे) हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांसमोरचा धोका आहे अन् त्यामुळे तो लोकशाहीशी विसंगत आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंदू राज्य होऊ देता कामा नये.’

असे प्रत्यक्ष असतांना साम्यवादी, पुरोगामी लोक याचे भाषांतर पुढीलप्रमाणे करतात, ‘हिंदु राष्ट्राची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली, तर या देशावर ती महाभयानक आपत्ती ठरेल. हिंदुत्वाचे समर्थक हिंदू त्याविषयी काहीही म्हणो; पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे शत्रू आहे. हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे. म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली, तरी आपण हिंदु राष्ट्र घडू देता कामा नये.’
साम्यवादी-पुरोगाम्यांनी अतिशय दुष्टपणे चुकीचे भाषांतर केल्याचे लगेच दिसून येईल. ‘हिंदु राज’ याचा खरा अनुवाद ‘हिंदु राज्य’ असा आहे; परंतु साम्यवादी-पुरोगाम्यांनी दुष्टपणे याचा अनुवाद ‘हिंदु राष्ट्र’ असा केला. ‘Hindus’, म्हणजे हिंदु लोक; पण साम्यवादी-पुरोगाम्यांनी त्याचा मुद्दामहून चुकीचा अनुवाद ‘हिंदुत्वाचे समर्थक’ असा केला, तसेच ‘हिंदुइझम’, म्हणजे ’हिंदुत्व’ नव्हे. (हिंदुत्व म्हणजे हिंदू समाजाचे एकत्व आणि त्यांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण. हा वेगळा सविस्तर चर्चेचा विषय आहे.)
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदु राज्य’ म्हणण्यामागील कारण
इथे डॉ. बाबासाहेबांनी ‘हिंदु राष्ट्र’ नाही, तर ‘हिंदु राज्य’ असा उल्लेख केलेला आहे. जेव्हा बाबासाहेब म्हणतात, ‘हिंदुइझम हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांसमोरचा धोका आहे, तेव्हा त्यांच्यासमोर चातुर्वर्ण्य आणि जातीव्यवस्था असते. या ठिकाणी बाबासाहेब हिंदुइझम आणि चातुर्वर्ण्य धर्म यांत कोणताही भेद करत नाहीत.‘ चातुर्वर्ण्य व्यवस्था, म्हणजेच हिंदुइझम’, असे ते मानतात. त्यामुळे ही विषमतेवर आधारित व्यवस्था स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांसमोरचा धोका असल्याचे बाबासाहेब म्हणतात.

जेव्हा ते म्हणतात की, ‘हिंदु राज्य अस्तित्वात आले, तर देशासाठी ती फार मोठी आपत्ती ठरेल’, तेव्हा त्यांच्यासमोर चातुर्वर्ण्य आणि जातीव्यवस्थेवर आधारित राज्यव्यवस्था-समाजव्यवस्था असते. या अर्थाने बाबासाहेबांचे म्हणणे योग्यच ठरते; परंतु ‘हिंदु राष्ट्र’ आपत्ती ठरेल’, असे बाबासाहेबांनी कधीच म्हटलेले नाही.
३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदु आणि मुसलमान हे २ स्वतंत्र ‘राष्ट्र’ असल्याचे मानणारे !
राष्ट्र (नेशन) आणि राज्य (स्टेट) या पुष्कळ भिन्न संकल्पना आहेत. ‘राष्ट्र’, म्हणजे एकत्वाच्या धाग्यांनी बांधला गेलेला आणि आपलेपणाची भावना असलेला एक समाज. ‘राज्य’ म्हणजे राज्यव्यवस्था. ‘हिंदु राष्ट्र’, म्हणजे कोणत्याही श्रुति, स्मृति, पुराणे अथवा धर्मग्रंथ यांवर आधारित धार्मिक राज्यव्यवस्थेपेक्षा ‘एकत्व आणि बंधुत्व यांच्या भावनेने बांधला गेलेला हिंदू समाज’. बाबासाहेब आंबेडकर यांनीही हिंदूंना उद्देशून ‘एक समाज’ या अर्थाने अनेकदा ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द वापरलेला आहे. बाबासाहेब हिंदु आणि मुसलमान हे दोन स्वतंत्र ‘राष्ट्र’ असल्याचे मानत होते. म्हणूनच त्यांनी फाळणीचा पुरस्कार केला.
४. बहुसंख्य समाजाच्या आधारे असलेले राष्ट्रीयत्व आणि डॉ. आंबेडकर यांनी इस्लामी कायद्याविषयी केलेले भाष्य
जगभरात बहुसंख्य समाजाच्या आधारे राष्ट्रीयत्व संबोधण्याची पद्धत आहे. त्यामुळेच आपण ‘हिंदु राष्ट्र’ असे संबोधतो. समाजव्यवस्था अथवा शासनव्यवस्था यांच्या संदर्भात पहाता ‘हिंदु राष्ट्र’ आणि राज्यघटनेवर आधारित ‘भारतीय राष्ट्र’, याचा आशय एकच असून त्यात कोणताही भेद नाही. हिंदू समाज हा धिम्या गतीने का होईना; पण सुधारणावादी, परिवर्तनवादी राहिलेला आहे. त्यामुळेच तो आधुनिक काळात विविध क्षेत्रांत प्रगतीपथावर आहे. त्याला स्वतःचा गौरवशाली इतिहास आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभिमान आहे. त्याने भारतीय राज्यघटनेवर आधारित आधुनिक सामाजिक आणि राजकीय व्यवस्था मनोमन स्वीकारलेली आहे. त्याला अल्पसंख्यांकवादाची चीड आहे आणि देशविरोधी इस्लामी मूलतत्त्ववादाची चिंता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘इस्लामच्या सिद्धांतांपैकी एक सिद्धांत असा आहे की, ज्या देशात इस्लामी राजवट नाही, अशा देशात जर इस्लामी कायदा आणि त्या देशाचा कायदा यांच्यात विरोध झाला, तर त्या देशाच्या कायद्यापेक्षा इस्लामी कायदा वरचढ ठरेल. त्या वेळी मुसलमानांसाठी इस्लामी कायद्याचे पालन करणे आणि त्या देशाच्या कायद्याचे उल्लंघन करणे, हे इस्लामनुसार न्याय्य ठरेल.’ (संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड ८, पान २९२) ‘इस्लामच्या या राष्ट्रविरोधी तत्त्वांमध्ये काही सुधारणा झाली आहे का ?’, हा खरा प्रश्न आहे.
– भारत आमदापुरे, अभियंता, पुणे. (७.१.२०२५)
काँग्रेसच्या राहुल गांधी यांची भारतद्रोही वक्तव्ये !![]() ‘आम्हाला हिंदुत्व नष्ट करायचे आहे’, ‘भारत हे एक राष्ट्र नाही’, ‘भारत तेरे टुकडे होंगे, इन्शाअल्लाह ! हे ‘जे.एन्.यू.’मधील (जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील) विद्यार्थ्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे’, ‘आम्हाला संपूर्ण भारतीय राज्यव्यवस्थेच्याच विरोधात लढायचे आहे’, ही सर्व वक्तव्ये ही काश्मीर खोर्यातील एखाद्या इस्लामी जिहाद्याची किंवा अबूझमाडमध्ये लपून बसलेल्या एखाद्या माओवादी कमांडरची नाहीत, तर देशाच्या संसदेतील विरोधी पक्ष नेत्याची आहेत. काँग्रेसच्या राहुल गांधींना अजूनही हा देश, म्हणजे आपल्या बापजाद्यांची कौटुंबिक जहागीरच (संपत्ती) वाटते. – भारत आमदापुरे (१६.१.२०२५) |