हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने उत्तर आणि ईशान्‍य भारतात ‘हिंदु नववर्ष’निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रम पार पडला !

या कार्यक्रमात ‘हिंदु नववर्ष चैत्र शुक्‍ल प्रतिपदा या दिवशी साजरे का केले जाते ? या दिवशी ब्रह्मध्‍वज म्‍हणजेच गुढी का उभारली जाते ? आणि ती उभारण्‍याची योग्‍य पद्धत’, यांसह अन्‍य शास्‍त्रीय माहिती विशद करण्‍यात आली.

भविष्यात सर्वांना ‘वृक्षरक्षक’ बनावे लागेल ! – धीरज वाटेकर, पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते

आपण स्वतःहून एखाद्या कुंडीत किंवा भूमीत बियाणे घालून झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न केल्यास ते झाड आपल्याशी हितगुज करत असल्याचे जाणवेल. यातून आपल्याला निसर्गाशी एकरूप होता येईल, ‘वृक्षरक्षक’ होता येईल.

भारतीय कुटुंबव्यवस्था ही जगात सर्वोत्कृष्ट ! – मेग जोन्स

जगातील अनेक देशांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली केवळ कागद काळे-पांढरे करण्यात येत आहेत; मात्र भारत सरकारने महिलांसाठी अनेक योजना चालू करून प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला आहे – जे विदेशी लोकांना कळते, ते येथील पुरो(अधो)गामी आणि सुधारणावादी यांना कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल !

गोवा : मये येथे २२ ते २८ मार्च गोमातेवरील शास्त्रीय ज्ञानावर आधारित संवादात्मक कार्यक्रम

या अनोख्या; पण उपयुक्त अशा व्याख्यानमालेसाठी नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक, पर्यटन व्यावसायिक, महिला बचत गट इत्यादी सर्वांनी सिकेरी गोशाळेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गोमंतक गोसेवक महासंघाने केले आहे.

आसाममध्ये ६०० मदरसे बंद केले आणि सर्वच बंद करण्याचा मानस !

जर आसामचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर अन्य राज्यांतील मुख्यमंत्री का करू शकत नाहीत ?

सिंधुदुर्ग : अंनिसच्या कार्यक्रमांना शाळांमधून कार्यक्रम घेण्यास अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करा !

वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या गोंडस नावाखाली हिंदु धर्म, त्यातील चालीरिती, प्रथा-परंपरा, देवता, संत, धर्मग्रंथ यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टीका करण्यात आल्याने एका संबंधित स्थानिक प्रशासनावर हे कार्यक्रम रहित करण्याची वेळ आली होती.

उत्तर प्रदेश : चैत्र नवरात्रीला प्रत्येक जिल्ह्यात दुर्गा सप्तशतीचे पठण होणार !

उत्तरप्रदेश शासनाने सर्व जिल्ह्यांतील सर्व देवीची मंदिरे आणि शक्तीपीठे यांमध्ये चैत्र नवरात्रीला दुर्गा सप्तशतीचे पठण अन् देवीचे जागरण आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. यासमवेतच अखंड रामायण पठणाचे आयोजन करण्यासही सांगितले आहे.

जेनेरिक औषधांमुळे देशातील रुग्णांचे २० सहस्र  कोटी रुपये वाचले ! – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड

‘पाचवा जनऔषधी दिवस’ १२ मार्च या दिवशी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील आय.एम्.ए. हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जैन समाज हा दुसर्‍यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. जैन समाजाने संकटप्रसंगी देशाला भरभरून साहाय्य केले आहे. समाजाप्रती त्यांची लोककल्याणकारी भावना सर्वांना ठाऊक आहे, असे गौरवोद्गाार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.