जेनेरिक औषधांमुळे देशातील रुग्णांचे २० सहस्र  कोटी रुपये वाचले ! – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड

(जेनेरिक औषधे म्हणजे रासायनिक पेटंटद्वारे संरक्षित केलेल्या औषधासारखे रासायनिक धर्म असणारे औषध ! मूळ औषधांवरील पेटंट कालबाह्य झाल्यावर जेनेरिक औषधांना विक्रीसाठी अनुमती दिली जाते.)

पाचवा जनऔषधी दिवस’ १२ मार्च या या कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर – जेनेरिकची औषधे ही सामान्य रुग्णांना परवडणारी आहेत. त्यामुळे आधुनिक वैद्यांनीही रुग्णांना परवडणारी औषधे द्यावीत. देशात जेनेरिक औषधांची जवळपास ९ सहस्र दुकाने आहेत. जेनेरिक औषधे ही ‘ब्रँडे’ड (नावाजलेल्या) औषधांपेक्षा ५० ते ९० टक्क्यांपर्यंत स्वस्त आहेत, तसेच ही औषध उच्च दर्जाचीही आहेत. या औषधांमुळे देशातील रुग्णांचे २० सहस्र कोटी रुपये वाचले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.‘

‘पाचवा जनऔषधी दिवस’ १२ मार्च या दिवशी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील आय.एम्.ए. हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.