राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून नागेशी (गोवा) येथे अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’

नागेशी, फोंडा येथे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची संघाचे काही प्रमुख अखिल भारतीय पदाधिकारी आणि निवडक संघ प्रेरित विविध संघटनांचे पदाधिकारी यांची अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’ होणार आहे.

आज धुळे येथे चौकाचे ‘वैद्यराज कै. प्रभाकर जोशी (नाना) चौक’ असे नामकरण होणार !

‘पंचकर्म उपचार’ गरीब रुग्णाला परवडेल अशा पद्धतीने या चिकित्सेचा प्रसार नानांनी केला. सहस्रो रुग्णांना पंचकर्माच्या साहाय्याने व्याधीमुक्त करणार्‍या या वटवृक्षाने अनेक शिष्य निर्माण करून ही परंपरा अखंड तेवत ठेवली.

बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा चीनचा प्रयत्न कदापी यशस्वी होणार नाही ! – दलाई लामा

चीनच्या सरकारने बौद्ध धर्म नष्ट करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते यात कदापी यशस्वी होणार नाही. चीनने अनेकदा बौद्ध धर्माला हानी पोचवली आहे; मात्र तरीही तो या धर्माला नष्ट करू शकला नाही; कारण आजही चीनमध्ये बौद्ध धर्म मानणारे लोक आहेत, असे विधान तिबेटमधील बौद्धांचे धर्मगुरु दलाई लामा यांनी येथे केले.

काँग्रेसने बहुसंख्य हिंदूंनाही समवेत घेतले पाहिजे !

राजकीय लाभासाठी आतापर्यंत मुसलमानांना जवळ करून हिंदूंचा छळ करत त्यांना ‘भगवे आतंकवादी’ म्हणणार्‍या काँग्रेसला आता पुन्हा सत्तेत येण्याठी हिंदूंची आठवण होऊ लागली आहे, हे लक्षात घेऊन अशा ढोंगी आणि हिंदुद्वेषी काँग्रेसचे राजकीय अस्तित्व नष्ट होईपर्यंत हिंदूंनी शांत बसू नये !

आज ‘वीर बालक दिवसा’निमित्तच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखांचे १० वे गुरु श्री गुरु गोविंद सिंह यांच्या ‘प्रकाश पर्व’ दिनानिमित्त त्यांचे पुत्र बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या हौतात्म्यावरून आजचा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

बदलापूर येथील प.पू. कृष्णानंद सरस्वती यांच्या जन्मदिनानिमित्त २१ ते २७ डिसेंबर या काळात आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन !

श्री रामदास आश्रमाच्या वतीने २१ ते २७ डिसेंबर या कालावधीत विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पुन्हा आपल्या मुलींची श्रद्धा न होण्यासाठी पुणे येथे ‘लव्ह जिहाद-एक भयाण वास्तव’ या विषयावर कार्यक्रम !

श्रद्धा वालकरच्या झालेल्या निर्घृण हत्येने आणि सामाजिक माध्यमावर अन् वर्तमानपत्रात आलेल्या बातमीच्या वृत्ताने पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’ हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका गंभीर विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात येणार आहे, आजच नोंदणी करा.

बाराबाभळी (नगर) येथे २ दिवसांच्या इज्तेमाचे आयोजन !

जिल्ह्यातील बाराबाभळी ग्रामपंचायत हद्दीतील जामिया मोहमदिया इशातुल उलूम मदरशाच्या मैदानात १६ डिसेंबरपासून २ दिवसांचा ‘इज्तेमा’ हा धार्मिक कार्यक्रम चालू झाला आहे. या इज्तेमासाठी जवळपास १ लाख मुसलमान येण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील मजुरांना ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ या ग्रुपच्या माध्यमागून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

या ठिकाणी उपस्थित सर्व ऊसतोड कामगार बंधू-भगिनींमध्ये आम्हाला प्रत्यक्ष विठू माऊलीचे दर्शन होत आहे. या माऊलींची सेवा करण्याची संधी आम्हाला मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपच्या माध्यमातून लाभली. त्यामुळे आम्ही भाग्यवंत आहोत.

पुरस्कारप्राप्त व्यक्ती समाजाला प्रेरणा देणार्‍या ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक

पुरस्कार विजेते हलाखीच्या परिस्थितीत, मध्यम कुटुंबातून पुढे आलेले आहेत. प्रचंड कष्ट करून स्वत:च्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो, हे या व्यक्तींनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आजच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती या उत्तुंग आणि समाजाला प्रेरणा देणार्‍या आहेत.