बीबीसीकडून गॅरी लिनेकर यांची क्षमायाचना !

नवी देहली – पत्रकार गॅरी लिनेकर यांची बीबीसीने क्षमा मागितल्याने ते पुन्हा बीबीसीवर त्यांचा फुटबॉलविषयीचा ‘मॅच ऑफ द डे’ हा कार्यक्रम चालू करणार आहेत.
गॅरी लिनेकर यांनी ब्रिटन सरकारच्या स्थलांतर धोरणाविरोधात केलेल्या ट्वीटनंतर त्यांना  बीबीसीने त्यांना काम थांबवण्यास सांगितले होते. यानंतर बीबीसीच्या कर्मचार्‍यांनीच याचा निषेध करत काम थांबवले होते. यामुळेच बीबीसीने क्षमा मागत लिनेकर यांना पुन्हा आमंत्रित केले.

संपादकीय भूमिका

नाक दाबले कि तोंड उघडते, असा धडा या प्रकरणातून बीबीसीला मिळाला आहे !