गोमंतक गोसेवक महासंघ आणि पतंजलि परिवार यांचा उपक्रम
मये,१९ मार्च (वार्ता.) – गोमंतक गोसेवक महासंघ आणि पतंजलि परिवार यांच्या वतीने सिकेरी, मये येथील गोशाळेत २२ ते २८ मार्च या कालावधीत दुपारी ४ वाजता प्रा. डॉ. हितेश जानी यांच्यासमवेत गोमातेवरील शास्त्रीय ज्ञानावर आधारित संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे, तरी कार्यक्रमात सुसूत्रता यावी यास्तव इच्छुकांनी अवश्य नावनोंदणी करावी, असे अयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे.
व्याख्याते प्रा. डॉ. हितेश जानी यांची थोडक्यात माहितीप्रा. डॉ. हितेश जानी हे जगप्रसिद्ध गुजरात आयुर्वेद विद्यापीठ, जामनगर येथे माजी प्राचार्य आणि पंचकर्म विभागाचे प्रमुख होते. सध्या ते विविध शासकीय आणि अशासकीय मानद पदांवर कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे भारतामध्ये आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी व्यापक अभ्यास, संशोधन, प्रशिक्षण आणि जागृती उपक्रम राबवण्याचे कार्य करतात. |
व्याख्याने पुढीलप्रमाणे असतील . . .
दिनांक |
विषय |
२२.३.२०२३ | फार्मास्युटिकल उद्योगांसाठी पंचगव्य |
२३.३.२०२३ | गौ आधारित सेंद्रिय शेतीत गोवा मॉडेल राज्य |
२४.३.२०२३ | A2 दूध आधारित डेअरी उद्योजकता |
२५.३.२०२३ | गोव्यातील गौ आधारित निरोगी पर्यटन |
२६.३.२०२३ | वैद्यकीय बांधवांसाठी पंचगव्याचे महत्त्व |
२७.३.२०२३ | गौविज्ञान आणि गर्भविज्ञानाद्वारे महिला सक्षमीकरण |
२८.३.२०२३ | गौ एक शास्त्रीय आणि सांस्कृतिक वारसा |
या कार्यक्रमात गोवा आयुर्वेदिक आणि इतर संबंधित भारतीय औषध प्रणाली परिषद, आयुर्वेद व्यासपीठ (गोवा शाखा), गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन (GAMA), आरोग्य भारती (गोवा शाखा), गोवा कृषी विभाग, गोवा सरकार; गोवा पशूसंवर्धन विभाग, गोवा सरकार आणि भारतीय कृषी संशोधन परिषद गोवा शाखा सहभागी असतील.
या अनोख्या; पण उपयुक्त अशा व्याख्यानमालेसाठी नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक, पर्यटन व्यावसायिक, महिला बचत गट इत्यादी सर्वांनी सिकेरी गोशाळेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गोमंतक गोसेवक महासंघाचे संस्थापक श्री. कमलाकांत तारी यांनी केले आहे.