हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने उत्तर आणि ईशान्‍य भारतात ‘हिंदु नववर्ष’निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रम पार पडला !

धनबाद (झारखंड) – ‘हिंदु नववर्ष’ म्‍हणजेच ‘चैत्र शुक्‍ल प्रतिपदा’ या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन याविषयीची माहिती जिज्ञासू अन् धर्मप्रेमी यांना कळावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने २० मार्च या दिवशी उत्तर आणि ईशान्‍य भारत या राज्‍यांत ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता.

या कार्यक्रमात ‘हिंदु नववर्ष चैत्र शुक्‍ल प्रतिपदा या दिवशी साजरे का केले जाते ? या दिवशी ब्रह्मध्‍वज म्‍हणजेच गुढी का उभारली जाते ? आणि ती उभारण्‍याची योग्‍य पद्धत’, यांसह अन्‍य शास्‍त्रीय माहिती विशद करण्‍यात आली. या कार्यक्रमात बिहार, उत्तरप्रदेश, कतरास, धनबाद, रांची, जमशेदपूर, हजारीबाग, कोलकाता आणि ईशान्‍य भारतातील राज्‍ये येथील अनेक जिज्ञासू सहभागी झाले होते. ईशान्‍य भारतातील ऑनलाईन कार्यक्रमात समितीच्‍या सुजाता ठक्‍कर यांनी, तर उत्तरप्रदेश आणि बिहार येथील कार्यक्रमात कु. कुहू पांडे यांनी उपस्‍थितांना अध्‍यात्‍मशास्‍त्रीय माहिती सांगितली.